
दैनिक चालु वार्ता
प्रतिनीधी नवनाथ यादव
भूम तालुका
भूम :-तालुक्यातील हाडोंग्री येथील जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र लोमटे यांचा कार्यकाळ संपल्याने शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक आरोग्य सेविका रेखा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा चे पूजन करून पुढील प्रक्रिया करण्यात आले .यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामा शंकर दांईगडे उपाध्यक्ष संध्या राहुल कदम ,सचिव सचिन लक्ष्मीकांत गोवर्धन यांच्यासह सदस्यपदी श्रीकांत जगदाळे ,काशिनाथ जावळे ,बाळू पाटील प्रमिला घोंगडे ,विक्रम जावळे ,आरती चव्हाण ,वैशाली तळेकर, पी एस राख यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य मुक्तापा तळेकर ,सरपंच सुधीर क्षीरसागर उपसरपंच कौशल्य शिरसागर ,गणेश क्षीरसागर,मीरा लोमटे, अश्विनी टेकाळे, सोनाली टेकाळे ,सत्यशीला टेकाळे ,अमोल कागदे ,बालाजी दाईगडे, आप्पा रामगुडवे,विश्वनाथ तळेकर ,अतुल वाघमारे ,अशोक वाघमारे, चक्रधर कचरे, गुरूलिंग साखरे ,गुप्तलिंग तळेकर,प्रभू लांडगे,जया टेकाळे ,मोहन लोमटे,विशाल कदम,अश्रुबा तळेकर, यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीनंतर नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.