
दैनिक चालु वार्ता
मरखेल प्रतिनिधी
एकनाथ गाडीवान
देगलूर :- देगलूर तालुक्यातील होट्टल केंद्रात देवापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कु.मयुरी गोविंद गायकवाड व कु.आयशा अहमद शेख हे विद्यार्थी शाळेतील असून इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन देवापूर गावाचे नाव उंचावून गावांमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धेचे साखळी निर्माण केली आहे.
कारण ग्रामीण भागात कोणतेही क्लास न असलेल्यामूळे एकीकडे कोरोनाचे संकट असल्यामुळे शाळा बंद अशा कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होते तरीही देखील जि.प.शा.देवापूर येथील मु.अ.श्री वाकडे सर व शिंदे सर यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे व विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम यांची सांगड व स्वतः अभ्यास करून या ञी सूञानुसार घवघवीत यश मिळवून ग्रामीण भागात शैक्षणिक आदर्श विद्यार्थ्यांनासमोर ठेवले आहे . विशेष म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम आयोजित केले.
त्यानंतर दोन्हींही विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विविध शैक्षणिक भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित म्हणून जि.प.प्रा.शाळेचे शिक्षक वर्ग जय भीम मिञ मंडळ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवक विद्यार्थी मिञ व तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक गावकरी मंडळी ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी यांच्या तर्फे स्वागत करण्यात आले .