
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- आजी सैनिक शिवहर कागणे यांचा सेवाकाळ चालू असताना मायदेशी आल्यावर त्यांनी देशसेवेचे व्रत साेडले नाही. उतराखंड येथे हवलदार या पदावर ते कार्यरत असताना एक महिन्याच्या सुट्टीवर ते गावी आले असता त्यांना भरतीपूर्व प्रशिक्षणाची तयारी करताना काही मुले-मुली कंधार रोडवर दिसली.परंतु याेग्य मार्गदर्शन नसल्याचे जाणवले अन सुट्टीतला वेळ दिल्याने माेफत प्रशिक्षणाने तरुणाईत आनंद वाढला.
देशसेवेत जाण्याची इच्छुक तरुणांची संख्या कमी नाही. परंतु मार्गदर्शनाअभावी कंधार तालुक्यातील तरुणाई माघार आहे. हेच हेरुन ‘सुट्टीतली मजा’ सैनिक शिवहर कागणे यांनी कंधार/लोहा रोड विशवनाथ पेट्रोल पंपासमोर माेफत भरतीपूर्व प्रशिक्षण सुरु केले.आपल्या लक्षामागे धावणाऱ्या तरुणाईला मुलमंत्र दिला. तालुक्यातील गरीब मुलं,शरीराने फिट पण अर्थव्यवस्थेचा बोजवारा असल्याने कोणत्याही कँपला जात येणार नसल्याने कंधार ते गोलेगाव रनींग शहरातील पाच पंचवीस मुल-मुली गेली अनेक महिन्यांपासून शरीर पिळदार करीत प्रचंड मेहनत करणाऱ्या व आपल्या लक्षामागे धावणाऱ्या तरुणाईला कागनेनी दिला मुलमंत्र.
१४ वर्ष झाली देश सेवा सुरु आहे. बरीच सैनिक सुट्टीवर आल्यावर आपल्या कुटुंबाला वेळ देतात पण हा सैनिक कंधारच्या रोडवर सकाळी ५.३० ते ७ या वेळेत रस्त्यावर तरुणाईच्या घोळक्यात असतो.शिवहर कागणे यांनी सुट्टीवर आल्यानंतर हि त्यांनी देशसेवेचे व्रत साेडले नाही.भरतीपूर्व प्रशिक्षण स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे.हे पाहून तालुक्याच्या परिसरातून अनेक तरुण येण्यास उत्सुक आहेत.प्रशिक्षणाला सुरुवात झाली पण जागेची समस्या पुढे आली. पण यावर मात करीत कंधारच्या शिवारात असलेला पेट्रोल पंप निवडला.
तरुणाईला सापडला देवदुत काेविडच्या प्रभावात यशासाठी धडपडणाऱ्या तरुणाईला सैनिक शिवहर कागणे यांच्या रुपाने देवदूत सापडला. भरतीपूर्व प्रशिक्षण व स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु झाली. नियमितपणे व्यायामाने आमच्यात शारीरिक क्षमता वाढली,असे अनेक तरुणाने सांगितले तर अनेक गरीब तरुणाईच्या चेहऱ्यावर आनंद फुलू लागला.