
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- परमपूज्य गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालय, देगलूर येथे आज दि.12/01/2022 बुधवार रोजी राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली
आणि राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा करून सहभाग नोंदवला तर पाचवी ते सातवी च्या विद्यार्थींनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या विषयीची भाषणाचा व्हिडिओ तयार करून पाठवले या सहभागी विद्यार्थ्यानाचे कौतुक करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर आणि सर्व शिक्षक -शिक्षिका कर्मचारी उपस्थित होते.