
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
प्रा. मिलिंद खरात
वाडा :- महिलांवरील अन्याय-अत्याचार सहन केले जाणार नाहीत ,मग तो अन्याय करणारा कुठल्याही जाती-धर्माचा असो पोलिस प्रशासनाने त्यावर कठोर कारवाई करावी. अनंता वनगा संस्थापक
आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य.
वाडा तालुक्यात एका आदिवासी मुलीला लग्नाचे आमिष देऊन दोन वर्ष शारीरिक संबध ठेऊन शेवटी लग्नास नकार दिल्याने मुलीने व कुटुंबीयांनी आदिवासी मुक्ती मोर्चा चे अनंता वनगा यांच्या कडे विनंती करत न्याय मिळावा व लैंगिक अत्याचार व फसवणूक करणाऱ्या वर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.त्या नुसार आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणारे अनंता वनगा यांनी काल रात्री 10:30 वाजता आपल्या संघटनेच्या सदस्यासह स्वता:पीडिता सोबत वाडा पोलिस स्टेशन मधे जावून पि. एस. आय. पवार साहेब यांची भेट घेऊन सदर घटना सांगितली. त्या नुसार वाडा पोलिसांनी मुलाच्या विरोधात 376(2)(n) 417 गुन्हा दाखल केला असून आरोपीला वाडा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास वाडा पोलिस करत आहेत.
सदर घटना अशी की वाडा शहरातील आदिवासी समाजातील एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सतत दोन वर्ष शारीरिक संबध ठेवले,मुलगा वचन देऊन नेहमी म्हणायचा आपण लग्न करुया पण कधी लग्न करायचे ते काय तो मुलगा सांगत नव्हता,मग पुन्हा या मुलीने दि ४/१/२०२२ रोजी त्या मुलाला विचारले की लग्न कधी करायचे,तेव्हा मुलाने लग्नास विरोध केला. तुझ तू बघ मला लग्न करायला जमणार नाही असे त्या मुलाने सांगितले तेव्हा त्या मुलीने तीच्या राहत्या घरी विष प्राशन केले जेव्हा त्या मुलीच्या आई वडिलांच्या लक्षात आले त्या वेळेस त्या मुलीला लगेच ग्रामीण रुग्णालय वाडा येथे उपचारासाठी आणले, वेळीच उपचार झाल्याने मुलीचा जीव वाचला,परंतू ज्याच्या मुळे विषप्राशन केले त्या मुलावर अजूनही गुन्हा दाखल झाला नाही,वाडा पोलिस कुटुंबींयाना रोज वाडा पोलिस ठाण्यात बोलावत असत परंतु गुन्हा दाखल करत नव्हते शेवटी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटने चे अनंता वनगा यांच्या कडे न्याय मिळवून देण्याची विनंती कुटुंबीयांनी केली. त्या नुसार वाडा पोलीसांनी दखल घेऊन तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला रात्रीच अटक केली आहे.