
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
१४ जानेवारी भूगोल दिनानिमित्त…..
भूगोल या शब्दाचा सरळ अर्थ पृथ्वीचा गोल असा होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास हा भूगोलाचा मूळ हेतू आहे. पूढे पूढे भूगोलाच्या विविध शाखा वाढल्या अभ्यास ही वाढला. प्राकृतिक भूगोल ,मानव भूगोल, प्रादेशिक भूगोल, पर्यावरण ,विश्व विविध भूप्रदेश निसर्ग, खनिजे या सर्वांचा अभ्यास म्हणजे भूगोल. भूगोलाच्या अभ्यासात विविध पध्दतीचा समावेश झाला. निरीक्षण, नकाशे , संशोधन, सागरतळाचा शोध ते अवकाश म्हणजे भूगोल भूशास्त्र सामाजिक शास्त्र, जैविक शास्त्र, हवामान शास्त्र, खगोलशास्त्र, यांचा अभ्यास हा भूगोल विषयात येतो. म्हणून सर्व शास्त्राची जननी म्हणजे भूगोल होय.
मानवाने वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती साधली आहे. मानव अवकाशात झेप घेवू शकतो. ग्रह., तारे यांचा अभ्यास करु शकतो. म्हणून मानवाच्या जीवनात क्रांती घडून आली आहे. .. भूगोलाचा अभ्यास करण्याची एक विशिष्ट पध्दत आहे, हे निरीक्षणातून शिकण्याचे शास्त्र आहे. प्रत्यक्षात ज्या गोष्टी पाहता येतील त्या पहावयात ज्या गोष्टी प्रत्यक्षात पाहता येत नाहीत तेव्हा नकाशाद्वारे अंदाज घ्यावा. म्हणून नकाशा भूगोलाचा आत्मा आहे. यामुळे विविध देश, जगाची माहिती, नद्या, सरोवरे, पर्वत, सागर, विविध मार्ग , खनिजे, ठिकाणे याची माहिती नकाशाद्वारे मिळते. विद्यार्थी निरीक्षणातून भूगोलाचा चांगला अभ्यास करु शकतो.
ज्या खगोलशास्त्रज्ञ आपले आयुष्य संशोधन करण्यासाठी वेचले. विविध शोध लावले त्या गोष्टी आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. गॅलिलिओ, नील आर्मस्ट्राँग, अॅरिस्टाॅटल, कल्पना चावला सुनिता विल्यम्स अशा अनेक अंतराळवीरांनी भूगोल शास्त्राचा विकास साधला आहे. मानव जगाच्या पाठीवर जवळ आला आहे. संगणक प्रणाली मूळे अधिकाधिक माहिती मिळत आहे. तसेच विविध आपत्ती चा विचार करून तोंड द्यावे लागणार आहे भूकंप अवेळी पाऊस चक्रीवादळे नव संकट व्हायरस रोगराई यावर चिंतन करणे गरजेचे आहे पूर्व सूचना देणारे यंत्र निर्माण झाली आहेत . म्हणून भूगोल सर्व शास्त्राची जननी आहे.
भूगोल विषयाकडे शालेय स्तरावर जेवढे लक्ष देणे गरजेचे आहे ते दिले जात नाही कमी तासिका शेवटी तास खोली भूगोल, खोली साठी अनुदान या बाबी कडेलक्ष देणे गरजेचे वाटते. अभ्यास मंडळावर तज्ञ व्यक्तीची वर्णी लागावी . काही प्रमाणात शिक्षक मेहनत घेऊन अध्यापन करतात शिक्षक व विद्यार्थी यांना प्रोत्साहन द्यावे हीच अपेक्षा व भूगोल दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ….. _____________नारायण पारेकर फरांदेनगर नांदेड