
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
प्रा. मिलिंद खरात
पालघर :-पालघर तालुक्यातील मनोर गावा जवळ दहिसर मार्गे मनोर या हायवे वर वन क्षेत्रपाल श्रीमती. नम्रता हिरे व सफाळा वन विभाग यांनी संयुक्त कारवाई करत अंदाजे 9000 रूपये किमतीचा आरोपी सह चोरटा खैर वाहनांसह धडक कारवाई करत मुद्देमाला सह जप्त केला. वन क्षेत्रपाल श्रीमती. नम्रता हिरे यांना 31डिसेंबर रोजी मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गा क्रमांक 8 वर अवैध पध्दतीने चोरटा खैर यांची वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी मिळाली. या बातमी नुसार त्यानी आपल्या वन कर्मचाऱ्याच्या सहकार्याने मौजे गांजा ढेकाळे येथे सापळा रचला.
एक 407 वाहन प्रकार चे वाहन क्रमांक.MH04.CP 5466 हे संशयीत रित्या मनोर- मुंबई या हायवे वर भरधाव जात होते. त्याचा सतीवली येथ पर्यंत पाठलाग करून बनारस हॉटेल जवळ त्याची तपासणी केली असता त्यात चोरट्या रीतीने खैर या लाकडाची अवैध वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले .गाडी चालकाची चौकशी केली असता तो भिवंडी तालुक्यातील पडघा येथील असल्याचे समजले. सदर तस्करी मधे काही स्थानिक लोक पकडले गेले आहेत तसेच काही स्थानिक लोक सहभागी असल्याचा संशय आहे. सदर खैर तस्करीत राहुर- बोरिवली येथील मोठे व्यापारी असल्याचा दाट संशय आहे.
सदर पुढील तपास वन क्षेत्रपाल श्रीमती. नम्रता हिरे हया वरिष्ठ वन अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शना खाली करत आहेत.
सदर कारवाईत वन क्षेत्रपाल श्रीमती. नम्रता हिरे तसेच सफाळा वन कर्मचारी व वनपाल महेश उतेकर,मस्के,म्हात्रे, सीलेवेरा, पिंपळे, वनरक्षक मेघा, डगला पाठक, खेडकर ,पवार ,वाडू, गायकवाड, पाटील चव्हाण, केदारे, निकिता गवळी, शंकरपाळे सहभागी झाले होते.