
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
सुशिल घायाळ
मंठा :- मंठा तालुक्यातील पांगरी बु. येथील विश्वशांती बुद्ध विहाराच्या प्रांगणात बहुजनातील सदस्या द्वारे सकाळी नऊ वाजता माता जिजाऊ जयंती चे आयोजन करण्यात आले. माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेला मा.विलास हिवाळे सर भाऊराव खरात यांनी हार घालून प्रतिमेचे पूजन केले. सर्व गावाला ऐकू येण्याकरिता साऊंड सिस्टम ची योजना केली. बुद्ध वंदना व जिजाऊ वंदना म्हणवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मा विलास हिवाळे सर व प्रदीप हिवाळे सर यांनी माता जिजाऊ व छ. शिवाजी महाराज यांच्या विषयी सखोल माहिती दिली.
कोरोना संसर्ग सुरू असल्यामुळे जास्त गर्दी न होऊ देण्याची पूर्णपणे काळजी घेऊन 30 ते 40 महत्वाच्या व्यक्ती द्वारे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला महिला सदस्य सुद्धा उपस्थित होत्या. दिवसभर साऊंड सिस्टम द्वारे माता जिजाऊ, शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गीते, विविध भाषणे वाजविण्यात आले. व दिवसभर जयंतीचे वातावरण कायम ठेवण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन व यशस्वीतेसाठी सम्यक ग्रुप मित्र मंडळ पांगरी बु यांनी खूप परिश्रम घेतले.