
दैनिक चालु वार्ता
सिडको प्रतिनिधी
विक्रम खांडेकर
सिडको :-सिडको जिजाऊ सृष्टी येथे राष्ट्रमाता, राजमाता, मासाहेब, जिजाऊ जन्मोत्सवानिमीत्त विविध सामाजिक संघटनेच्या व अनेक राजकीय पक्षाच्या वतीने. जिजाऊंना अभिवादन करण्यात आले.
लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांवर संस्काराची बीजे पेरणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माॅं साहेब जन्मोत्सवानिमीत्त सिडको जिजाऊ सृष्टी येथे जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी जिजाऊंना अभिवादन करण्यात आले.त्यानंतर सामुहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली. संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.जिजाऊ जन्मोत्सवानिमीत्त जिजाऊ सृष्टी परिसर गजबजुन गेला होता.दिवसभर जिजाऊ अनुयायांनी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी अगदी सकाळपासूनच याठिकाणी कोरोणाचे नियम पाळून सामाजिक अंतर ठेवून अभिवादन केले.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक विनय पाटील गिरडे, सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे,भाजपा युवा मोर्चा चे महानगराध्यक्ष संजय घोगरे, नगरसेवक प्रतिनिधी उदय देशमुख,जनार्धन गुपिले, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष सरस्वती धोपटे ,माजी नगरसेविका प्रा.ललिता शिंदे, डॉ.करूणा जमदाडे,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उद्धव सुर्यवंशी,भाजपाचे मंडळअध्यक्ष वैजनाथ देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शाम पाटील कुशावाडीकर, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे,विर भगतसिंग विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष इंजि.प्रवीण जाधव, संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप गुबरे, संभाजी ब्रिगेड दक्षिण विधानसभा अध्यक्ष दीपक भरकड, ब्लॉक कांग्रेस कार्याध्यक्ष राजु लांडगे, दक्षिण युवक काँग्रेस महासचिव सतीश बस्वदे,पप्पु गायकवाड,संजय काळे,मराठा सेवा संघाचे सोपान पांडे, भगवान ताटे,साहेबराव गाडे,उद्धव दुरपडे,पंडीत पवळे, मराठा सेवा संघ सिडको अध्यक्ष त्र्यंबक कदम, सुभाष सुर्यवंशी, व्ही.डी. बिरादार, मधुकर गायकवाड, तुकाराम मस्के, दयानंद जाधव, नागनाथ महाजन, विश्वास खांडेकर,तसेच देविदास कदम,पत्रकार रमेश ठाकुर,शाम जाधव, निळकंठ वरळे,सारंग नेरलकर, विक्रम खांडेकर, अनिल धमणे, संभाजी सोनकांबळे, विश्वास हंबर्डे, वैजनाथ माने, प्रा.शशिकांत हाटकर, सुनील शिंदे,बि.एम. हिवराळे, उद्धव ढगे,प्रा अशोक मोरे,रमेश नांदेडकर,शंकरराव धिरडीकर,आनंदा गायकवाड,वामन देवसरकर,के.एल.ढाकणीकर,बालाजी नाइकवाडे, विष्णु जाधव, गजानन पवार, गजानन शिंदे,शिवाजी हंबर्डे , गजानन कहाळेकर,रोहिदास कवाळे,मयुर अमिलकंठवार,भुजंग जाधव, ज्ञानेश्वर शिंदे,अमोल जाधव,आंकुश कोल्हे,मेरवान जाधव,प्रा.मुकुंद बोकारे, प्रकाश वानखेडे, जिजाऊ ब्रिगेड सिडको अध्यक्षा ज्योती पाटील,मणकर्णा ताटे,शकुंतला पांडे,कमल हिवराळे, रूक्मिणी सुर्यवंशी,प्रेमला सुर्यवंशी,संगिता मोरे,संगिता कदम कविता चव्हान, विमलबाई चित्ते, अनिता गज्जेवार,यांच्या सह अनेकांनी अभिवादन केले.