
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी किनवट
दशरथ आबेकर
किनवट :- संयुक्त वन व्यवस्थापन समितीची मान्यता न घेताच वनपरिक्षेत्र अधिकारी अप्पाराव पेठ व सचिव यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अशी लेखी तक्रार निवेदनाद्वारे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकिसन पुंजाराम दांडेगावकर, उपाध्यक्ष शेख जब्बार शेख अहमेद, व इतर सदस्य यांनी केली आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समिती तल्हारी तालुका किनवट येथील आदिवासी तसेच अनुसूचित जाती, जमाती लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्याकरिता सन २०१४ -२०१५ मध्ये अर्ज मागविण्यात आले होते.सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून ७५टक्के तर, लाभार्थीकडून २५% समितीला गॅस रिफील साठी अनुदान देण्यात आले.
शासनाकडून व लाभार्थ्यांकडून सदरील योजनेची गॅस रिफील साठी रक्कम जमा करण्याकरिता समितीच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण बँक शिवणी येथे बचत खाते उघडण्यात आले त्याचा खाते क्रमांक ५४१०१०४४५९० असा असून सदरील योजने अंतर्गत सन २०१९ मध्ये समितीच्या खात्यामध्ये ३८लाख १६ हजार ५७९ रुपये वर्ग करण्यात आले. संयुक्त वन व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता सदरील समितीचे सचिव व आप्पाराव पेठ येथील तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी परस्पर संयुक्त वन व्यवस्थापन समितीची दिशाभूल व फसवणूक करून २८ लाख पाच हजार २८७ रुपये बँकेच्या खात्यांमधून काढून शासनाची दिशाभूल केली. सदरील योजनेचा फायदा येथील लाभार्थ्यांना मिळाला नसून, या योजनेपासून लाभार्थी वंचितच राहिले आहे़ संबंधित संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सचिव व आप्पाराव पेठ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गॅस रिफील साठी चेक देणे आहे, म्हणून कोऱ्या कागदावर संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांची सही घेऊन २८ लाख पाच हजार २८७ रुपये बँके मधून काढून स्वतःचे खिसे भरले असे मत संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
सचिव व वनपरिक्षेत्र अधिकारी यांची चौकशी करून वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा अशी मागणी वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामकिसन पुंजाराम दांडेगावकर उपाध्यक्ष. शेख जब्बार शेख अहमेद वन व्यवस्थापन समितीचे सदस्य विठ्ठल सायना नारधकर, बालाजी घरमागौड नक्कलवाड, तल्हारी यांनी लेखी तक्रार निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे केली आहे