
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधि
मारोती कदम
कंधार :- भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दि.13/01/22 रोजी लोहा व कंधार मडंळाची बैठक सुनेगांव येथे पार पडली. या बैठकीस लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब व मराठवाडा विभागीय संघटनमंत्री मा.संजयजी कौंडगे साहेब,लक्ष्मण ठक्करवाड बुथ संयोजक, वारकड गुरूजी,प्रविण पाटील चिखलीकर जि.प.सदस्.माधव पा उच्चेकर जिल्हा सरचिटणीस,तुकाराम वारकड,शरद पवार ता.अध्यक्ष लोहा,भगवान राठोड ता.अध्यक्ष कंधार,सुरेश गायकवाड संयोजक, श्रीनिवास यन्नावार संयोजक,चित्रारेखाताई गोरे जिल्हा अध्यक्षा म.मो,पंजाबराव पा.वडजे,सचिन पाटील चिखलीकर , सुनिल भाऊ मोरे नांदेड दक्षिण भाजपाध्यक्ष, विक्रम कदम उपसरपंच आंबेसागवी , तालुक्यातील पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी त्यांच्या मनोगतातून सर्व भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटित व्हावे व एकजुटीने काम करावे असे आवाहन केले .
भाजपा पक्ष संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे यांनी कार्यकर्ते भाजपा अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुख यांनी समन्वयाने काम केले पाहिजे पक्ष संघटना वाढेल, आगामी निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने काम करावे असे मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर साहेब सुद्धा भाजपा कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन गोरगरिबांच्या समस्या सोडवल्या पाहिजे ,असे पदाधिकाऱ्यांना सांगितले येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला पक्ष भाजपा एक क्रमांकावर जाईल असे काम सर्वांनी एकजुटीने करावे लागेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मध्ये ग्राउंड लेव्हल पर्यंत काम करायचे आहे असे आवाहन बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व भाजपा कार्यकर्ते यांना केले आहे . व हे काम तुम्ही करू शकता . असे जमलेल्या सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे मोलाचे मार्गदर्शन प्रवीण पाटील चिखलीकर यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर पवार यांनी केले तर आभार सुरेश गायकवाड यांनी मानले