
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगारविषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत.त्यासाठी www.roigar. mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. त्याचा वापर आस्थापनांनी करण्याचे आवाहन सहायक रोजगार व उद्योजकता आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.
उद्योजक व आस्थापना यांनी सेवा योजन कार्यालय ( रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा ) कायदा १९५९ व नियमावली १९६० कलम (१) व कलम ५(२) अन्वये त्रैमासिक ई-आर १ ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.डिसेंबर २०२१ अखेर संपणाऱ्या तिमाहीसाठी ई-आर १ प्रपत्राची माहिती या संकेतस्थळावर उद्योजक व आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून ऑनलाईन सादर करावी व प्रमाणपत्र संकेतस्थळावरून मिळवावे.हे विवरणपत्र ३१ जानेवारीपूर्वी सादर करणे बंधनकारक आहे.ते सादर न केल्यास आस्थापनांवर कारवाईचा इशारा श्री.शेळके यांनी दिला आहे.
काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास,रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,अमरावती या कार्यालयाशी किंवा दुरध्वनी क्रमांक ०७२१-२५६६०६६ यावर संपर्क साधावा.हे कार्यालय रेल्वेस्थानक-बसस्थानक रस्त्यावरील मशिदी नजिकच्या इमारतीत स्थित आहे.