
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- कंधार येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये शेतकऱ्याच्या अतिवृष्टीचे पैसे जमा झाले आहेत. ते पैसे उचलण्यासाठी बँकेपुढे सकाळ पासूनच रांगा लागत आहेत. बँक उघडल्यावर पैसे उचलण्यासाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी होत आहे. पण या गर्दीचा बँकेवर व तेथील कर्मचाऱ्यावर काहीच फरक पडत नाही. कोण कर्मचारी, कोण मॅनेजर कोणालाच काही कळत नाही. बँकेमध्ये कॅश हि नाही आणि स्लीप ही मिळत नाही. शेतकऱ्याच्या रांगा बँकेच्या मुख्य दरवाजा पासून ते मॅनेजरच्या खुर्चीपर्यंत खचाखच भरून शेतकरी उभे आहेत. ना मास्क, ना सोशल डिस्टन्स बँकेत काय चालू आहे कोणालाही काहीच कळत नाही. दलालामार्फत स्लिप भेटत आहे. पण बँकेतून मिळत नाही. शेतकऱ्याला यादी मिळत नाही.ना खाते क्रमांक मिळत नाही. दलालामार्फत शंभर रुपयाला एक स्लिप मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
बँकेतील मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी नियोजन करून पैसे द्यायला पाहिजे होते. पण तसे झाले नाही. ज्याची चलती, ज्याची ओळख त्याला पैसे अगोदर असे चित्र पाहावयास मिळत आहे. बँकेमध्ये कर्मचारी त्यांच्या वेळेनुसार बँकेत कामावर येत आहेत. पण शेतकरी मात्र आज पैसे भेटतील म्हणून सकाळपासूनच रांगेत उभा आहे. शेवटी कॅश संपली नाही तर स्लिप संपली असे सांगण्यात येत असल्यामुळे शेवटी निराशा पदरी घेऊन घरी वापस जावे लागत आहे. दुसऱ्या दिवशी हि स्लिपसाठी, जागेसाठी पुन्हा तीच कसरत करावी लागत आहे. या सगळ्या प्रकारावरून असे दिसून येते की कंधारची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार म्हणजे आंधळ दळत अन् कुत्र पीठ खातय असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सर्व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. हे काम माझे नाही. त्या साहेबांना भेटा असे उत्तर देत असल्यामुळे भेटावे तरी कोणाला? अशी वेळ आम्हा शेतकऱ्यावर आली आहे. बँकेतील उपस्थित असलेले शेतकरी.कोण साहेब आहे.आणि कोण दलाल आहे.हेच आम्हाला कळन अवघड झाला आहे. आम्ही बऱ्याच जणांनी शंभर रुपये देऊन ही आम्हाला स्लिप भेटली नाही. बँकेतील उपस्थित असलेले शेतकरी. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कंधार शाखा व्यवस्थापकाचा मनमानी कारभार सुरु असून शेतकऱ्यांचे अनुदान देण्यास टाळाटाळ करित असल्याचे कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी वर्गातुन बोलले जाते.
काही जणांना ए. टी. एम कार्ड दिले काही जणांना दिलेच नाहीत ए.टी.एम कार्ड देऊन जवळ पास एक ते दोन महिने झाले.तरी ए.टी.एम कार्ड बऱ्यांच शेतकर्यांचे चालूच केले नाहीत.व पासबुक दिले मात्र त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे जमा न करता त्या शेतकऱ्यांच्या नावाचे दुसरे अकाउंट काढले असे कंधार तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकर्यांची समस्या आहे,सर्व कर्मचारी उडवा उडवी चे उत्तर देत असतात. शेतकरी आर्थिक मेटाकुटीला असताना शासनाने मदतीचा हात दिला मात्र शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध झाले तरीही बँकेचा मॅनेजरचा कारभार मनमानी झाला.
तालुक्यातील निर्सगाच्या लहरी पणाने कळस गाठल्याने शेतीचे अर्थकारण बिघडले आहे. कोरडा ओला दुष्काळ गारपीठ सततची नापिकी अतिवृष्ट चक्र शेतीला मारक ठरत आहे.