
दैनिक चालु वार्ता
नळगीर प्रतिनिधी
केंद्रे प्रकाश
अतनूर :- (दि.१२) जानेवारी अतनूर येथे राजमाता जिजाऊ यांची ४२४ वी. जयंती व स्वामी विवेकानंद यांची १५९ वी जयंती युवा दिवस म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात विविध सेवाभावी संस्था, विविध पक्ष, विविध संघटना, सामाजिक संस्था, सामाजिक संघटना, महिला मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली.
प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रथम नागरिक गावचे सरपंच चंद्रशेखर पाटील, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसकडून लातूर जिल्हाअध्यक्ष संजय शिंदे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जळकोट तालुका अध्यक्ष विनोद कांबळे, शिवसेनेच्या वतीने जळकोट तालुकाउपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, भाजपा जळकोट तालुकाउपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, रमेश बोडेवार, सूर्यकांत तेलंगे, प्रभुराव गायकवाड, दत्ता कापडे,चंद्रकांत गायकवाड, ज्ञानोबा वाघमारे, एकनाथ गायकवाड, उत्तम कांबळे, बालाजी येवरे, सूर्यकांत बोडेवार, कैलास सोमुसे-पाटील, ज्ञानेश्वर जाधव, माधव सोमुसे, अविनाश शिंदे, पत्रकार बालासाहेब शिंदे, पत्रकार किशन मुगदळे, शिक्षक विजय पाटील, शिक्षक साहेबराव पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हा संघटक बालासाहेब शिंदे, शिवसेना व युवासेना विभाग प्रमुख मुक्तेश्वर येवरे-पाटील, शिक्षक संग्राम पवार, लातूर जिल्हा युवक कुणबी मराठा मंडळाच्या वतीने माधवराव नाईकवाडे, साधुराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजकुमार कापडे, जिजामाता महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.संध्या शिंदे, सौ.शोभा शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने अध्यक्षा सौ.रुक्मिणी सोमवंशी, सचिव सौ.एस.बी.शिंदे, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बी.जी.शिंदे, जय हिंद क्रीडा व व्यायाम शाळेच्या वतीने हणमंत साळुंके यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
जिजामाता प्राथमिक शाळेत सामाजिक कार्यकर्ते तथा समाजसेवक आरोग्य दूत पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण सोमवंशी यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर शिंदे यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.