
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या शहरातील एका मोठ्या आणि प्रसिद्ध अशा समजल्या जाणाऱ्या राज क्लाँथ सेंटर या दुकानावर औरंगाबाद महानगरपालिका आणि कामगार विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. यावेळी कारवाईसाठी आलेल्या पथकाने दुकान सील केलं असून, पुढील आदेशापर्यंत हे दुकान बंद राहणार असल्याची माहिती कारवाईसाठी आलेल्या अधिकार्यांनी दिली आहे .
अधिक माहिती अशी की, कोरोना नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील आकाशवाणी चौकातील नामांकित राज क्लॉथ स्टोरवर महानगरपालिकेकडून काल ( दि. १३ – गुरूवार ) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही धङक कारवाई करण्यात आली आहे . यावेळी दालनातील एका कर्मचाऱ्याने मास्क लावलेला नव्हते तर , दुसऱ्या चार कर्मचाऱ्यांनी लसीचा डोस घेतला नव्हता . त्यामुळे आता पुढील आदेशापर्यंत हे दुकान पथकाकडून त्वरीत सील करण्यात आलं आहे . मनपाच्या या कारवाईने व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे .
यापूर्वी सुद्धा अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील नामांकित हॉटेल असलेल्या भोज रेस्टॉरंटवर कारवाई केली होती . यावेळी ५० % ग्राहकांना परवानगी असताना सुद्धा त्यापेक्षा कितीतरी पटाने ग्राहक रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होते . तर अनेक कर्मचाऱ्यांनी मास्क सुद्धा लावलेले नव्हते . त्यामुळे कोरोना नियम तोडणाऱ्या या हॉटेलला सील केले होते . त्यानंतर जिल्हाधिकारयांनी सुनावणी घेऊन लिखीत स्वरूपात माफीनामा व १५ हजारांच दंड घेऊन हॉटेल सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते .