
दैनिक चालु वार्ता
नळगीर प्रतिनिधी
केंद्रे प्रकाश
उदगीर :- उदगीर तालुक्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. हे अतिशय वाईट असुन दुर्दैव आहे शेतकऱ्याचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.पिकविमा काही शेतकऱ्यांना वाटप झाला व विमा प्रतीनिधी यांच्या हलगर्जीपणा मुळे काही शेतकरी पिकविमा पासुन वंचीत आहेत. ज्या शेतकरी बांधवांना पिकविमा रक्कम मिळालेली नाही त्यांच्या बँक खात्यावर आठ दिवसांच्या आत रक्कम जमा करावे अनेक अडचणीतून
विमा भरला असुन मोठ नुकसान झाले आहे.
पिक विमा भरला मंजुर झाला पण बँक खात्यावर का येत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.शेतकर्यांचा मात्र निसर्गाने घात केला असुन ही शासनाने शेतकर्यांच्या तोंडचा घास हिस्काऊ नये येत्या आठ दिवसांत पिकविम्याची रक्कम खात्यावर पैसे जमा करा नाही तरी उदगीर तालुक्यातील कुठल्याही ठिकाणी एकही अधिकारी, नेता, विमा कंपणीचा अधिकारी फिरू देणार नाही असा इशारा रयत शेतकरी संघटनेचा इशारा आहे