
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजर्डे पाटिल
लासुर सबस्टेशन अंतर्गत सावंगी, दायगाव,धामोरी व परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी विजबिल भरलेले आहे, त्यांना कायद्यानुसार वीजपुरवठा करणे बंधनकारक असताना महावितरणने सरसकट डीपी बंद केल्यामुळे या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे गहू, कांद्याच्या रोपांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही महावितरण ने त्यांचे वैयक्तिक कनेक्शन कट करणे अपेक्षीत असताना सरसकट डीपी बंद केल्यामुळे वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही.
सरसकट DP बंद केल्यामुळे दायगाव, सावंगी व धामोरी येथील शेतकऱ्यांनी धमोरीचे उपसरपंच रवींद्र चव्हाण यांना फोन करून कळविले की, आम्ही बिल भरले आहे तरीही आमची DP बंद करण्यात आली आहे. यावेळी रवींद्र चव्हाण ,अमोल जाधव , संजय पांडव यांचेसह शेतकरी 11 वाजता लासुर सबस्टेशनला पोहचले. यावेळी येथिल इंजिनिअर आहेर यांच्यासह वायरमन देखील उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना महावितरण रात्रीच्या वेळी वीजपुरवठा करीत असल्यामुळे वायरमन रात्री ड्युटीवर उपस्तीत राहणे किंवा किमान फोनवर तरी उपलब्ध असणे आवश्यक असतांना एकाचाही फोन चालू नव्हता.
येथील इंजिनियर ला मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना रात्री पावणेअकराच्या सुमारास आम्ही सर्व शेतकरी बांधव सब स्टेशनला जमलोअसता या ठिकाणी इंजिनियर मुख्यालयी राहत नाही. म्हणजे शेतकर्यांना वार्यावर सोडून हे सर्व कर्मचारी व इंजिनियर आरामशीर रात्री झोपा काढत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. विजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना वीजपुरवठा करणे महावितरणला कायदेशीर बंधनकारक आहे. तरीही महावितरण सर्रास थेट Dp बंद करीत आहे.महावितरण कायद्याचा भंग करीत असून, विजबिल भरलेल्या शेतकऱ्यांना वीजपुरवठा न केल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक होईल याची महावितरण च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी – रवींद्र चव्हाण, उपसरपंच धामोरी खुर्द