
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
जव्हार: जव्हारच्या जनतेच्या अस्मितेचे प्रतिक असणाऱ्या जुन्या राजवाड्याची वास्तू व परीसर पडीक खडर बनला असून नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे येथे गर्दुल्ले, चरसींचा वावर असतो. नगारखान्यावर झाडे उगवली आहेत, त्याची तटबंदी ढासळण्याच्या स्थितीत आहे. जुना राजवाडा भग्नावस्थेत पहावयाला मिळतो. राजवाडयाची इमारत दुमजली असून , तिथे काही वर्षे भारती विद्यापीठ व नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाचे कार्यालय होते.
राजदरबार, उद्याने, पाण्याचा तलाव, घोडयांच्या पागा, विहीर, भव्य पटांगण, कडेकोट भिंती आणि चारी दिशांनी असणारे बुरुज असे वैभव या राजवाडयाचे होते. सुमारे २१,००० चौ.मी. क्षेत्र असलेला हा जुना राजवाडा आज जव्हार नगरपरिषदेच्या ताब्यात आहे. खुले नाटयगृह, शिक्षण मंडळाचे कार्यालय, व्यायामशाळा, क्रीडांगण, गणपती सभागृह, पाण्याचे उंच जलकुंभ, अशा नागरी सुविधांसाठी या राजवाडयाच्या इमारतींचा वापर केला जातो.
ही ऐतिहासीक वास्तू असल्याने पुरातत्व खात्यानेही इकडे द्यावे अशी मागणी जव्हारवासी करीत आहेत. या परिसरातील कारागीर आणि जव्हार जवळील न्याहळे येथील कावळ्याचा बांध खाणीतील मजबूत व सुंदर दगडातून हा राजवाडा बांधण्यात आला. पुढे राजे कृष्णशहा यांनी राजवाड्याचा विस्तार करून अतिभव्य असा नगारखाना, गणपती मंदिर व अनेक खोल्यांचा विस्तार केला. आज जव्हारच्या इतिहासाताची साक्ष देणाऱ्या जव्हार मधील जुन्या राजवाड्याची अवस्था बिकट झाली आहे.
जीर्णोद्धार होत नसल्याने तटबंदी व इमारत अखेरची घटका मोजत आहे. जव्हार नगरपरिषदेने नुकतेच शंभर वर्षे पूर्ण करण्याचा मान मिळवला असला तर आज ही जव्हार मधील जनता विकासाची वाट पाहत आहे. गेल्या चार वर्षात शेकडो कोटी रुपये निधी उपलब्ध होऊन सुद्धा जुन्या राजवाड्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले जात नसल्याने जव्हारकर संताप व्यक्त करत आहेत.
त्यामुळे सत्ताधारी जरी कोट्यवधी रुपये निधी आणला असे म्हणत असले तरी मात्र सत्ताचा कार्यकाल संपण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत तरीही एकही विकासकाम पूर्ण झाले नाही हे वास्तव आहे-पहिला राजवाडा हा खरा २६१ वर्षांपूर्वीचा नरेश श्रीमंत यशवंतराव मुकणे राजेसाहेबानी कृतज्ञतेच्या भावनेतून आपला ऐतिहासिक असा जुना राजवाडा, जव्हार नगरपरिषदेला भेट दिला. हल्लीचा जुना राजवाडा या परिसरात सन १७५० साली कृष्णा राजांनी बांधला होता. दुदैवाने अवय ७२ वर्षांनी सन १८२० साली तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
आज त्या जागी खुले नाट्यगृह आहे. त्यानंतर वर्षांनी सन १८२७ मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या राजवाडयाचे बांधकाम, आपला मुलगा पतंगराहा याला राजगादीवर बसवून त्यांच्या नावाने कारभार पाहणाऱ्या राणी सगुणाबाई यांनी सुरु केले -राजे यशवंतराव मुकणे यांनी मोफत दान केला. जव्हारचे राजे कै. यशवंतराव मुकणे यांनी आपल्या मालकीच्या खूप वास्तू जव्हार नगरपरिषदेस दान स्वरूपात दिल्या. मुकणे राज्यानी जव्हार नगरपरिषदस मोफत जुना राजवाडा दान केला. मात्र जव्हार नगरपरिषदेने आजवर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती न केल्याने सदर ऐतिहासिक वास्तू आज अखेरच्या घटका मोजत आहे.
जव्हार नगरपरिषदेने या राजवाड्याच्या विकासासाठी आदिवासी सृष्ठी तिथे निर्माण करणार असल्याचे समजते मात्र त्याला आजपर्यंत राज्य शासनाने मान्यता दिलेली नाही – राजवाड्यात डम्पिंग ग्राऊंड
ऐतिहासिक वास्तू असलेल्या जुन्या राजवाड्याच्या मागील बाजूस जव्हार नगरपरिषदेने डम्पिंग ग्राऊंड तयार केले आहे. ही बाब अत्यंत लज्जास्पद असून, सर्व गावचा कचरा राजवाड्याचा परिसरात जमा केला असल्याने नाराजी व्यक्त केली जाते आहे. या राजवाड्याच्या दुरुस्तीसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महोदयांना निवेदन दिले आहे.जुना राजवाड्याची अवस्था बिकट झाली पाहुन अत्यंत दुःख होते. नगरपरिषदेला राजवाड्याची दुरुस्ती करण्याची सद्बुद्धी यावी.
सदर राजवाडा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार ह्या स्थळी असून ह्या ठीखाणी अनेक ठिकाणाहून पर्यटक येत असतात त्या मुळे या ठिकाणचे काम लवकरात लवकर व्हाव्हे अशी मागणी लोकमत पत्रकार रविंद्र साळवे व महानगरी टाइम्सचे पत्रकार रमेश शिंदे या युवा पत्रकारांची सातत्याने मागणी.