
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
मारतळा :- लोहा तालुक्यातील मारतळा ते नांदगाव ह्या रस्तावर मोठ्या प्रमाणात जागोजागी खड्डे पडले असून या रस्त्यावर पाऊस पडल्याने गाडीवर येणे-जाणे करणे जीवघेणे झाले आहे.हा रस्ता चालण्यायोग्य सुद्धा राहिला नाही.तसेच शेतातील मालवाहतूक करणाऱ्या गाड्यासुद्धा असा रस्ता पाहून; शेतातील माल खरेदी साठी टाळाटाळ करत आहेत आणि या गावात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते.
तसेच ह्या काढणीला आलेल्या ऊसाच्या पिकाला नेण्यासाठी रस्ता राहील नाही तेव्हा शेतातील माल हा शेतातच खराब होऊन जात आहे.त्यामुळे नांदगाव गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.तेव्हा मारतळा ते नांदगाव हा रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी नांदगावच्या नागरिकांकडून होत आहे.