
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी/राजेश गेडाम
भंडारा :- भंडारा येथील सिद्धी इंडस्ट्रियल गॅसेस प्रॉडक्ट प्रा. लि.भंडारा या प्रकल्पाचे आज उद्घाटन डॉ.परिनय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. महिला उद्योजकांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात ५१% महिला कर्मचारी कार्यरत आहेत. या प्रकल्पांतर्गत मेडिकल ऑक्सिजन, इंडस्ट्रियल ऑक्सिजन व नायट्रोजन गॅसची निर्मिती केली जाणार आहे. ‘ग्लोबल इंडस्ट्रियल कन्सल्टन्सी अँड कंत्राटदार’ यांच्या विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रतिदिन ५.५ टन एवढ्या क्षमतेने ऑक्सिजन निर्मिती केली जाऊ शकेल. सद्यस्थितीत या प्रकल्पात २००० ऑक्सिजन सिलिंडरचा साठा उपलब्ध असून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा प्रकल्प संजीवनीच ठरणार आहे.
कार्यक्रमाप्रसंगी तुमसरचे नगराध्यक्ष श्री प्रदीपजी पडोळे, श्री प्रकाशजी बालबुद्धे, बॅंक ऑफ बडोदाचे रिजनल हेड श्री संजीव सिंग, एसएमई श्री संदिपजी केरकट्टा, शाखा अधिकारी श्री देवळीकर, श्री जयेशजी निमजे, श्री हेमंतजी देशमुख, श्री तिलकजी वैद्य, श्री रोहितजी भोंगाडे, श्री निलुजी अवगाते, श्री निळकंठजी कायते, सौ. कल्याणीताई भुरे, श्री मुन्नाभाऊ फुंडे, श्री मिलिंदजी मदनकर, श्री निशिकांतजी इलमे, श्री प्रवीणजी उदापुरे, श्री हेमंतभाऊ ब्राम्हणकर, श्री विक्रमजी रोडे, श्री संदिपजी भांडारकर आणि श्री शुभमजी मेंढे उपस्थित होते.