
दैनिक चालु वार्ता
नांदेड जिल्हा उत्तर प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
नांदेड :- नांदेड श्री शिवाजी हायस्कूल माणिक नगर नांदेड येथील वर्ग आठवी वर्गाची विद्यार्थिनी प्रणाली गंगाधर कुरुळेकर ही जिल्ह्यातून 72 वी व इयत्ता पाचवी वर्गातील विद्यार्थी धनंजय बाबू गावंडे हा जिल्ह्यात 180 वा आला आहे उत्तीर्ण झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक भगवान पवळे, शालेय समिती सदस्य सुर्यकांत कावळे, उपमुख्याध्यापक सुधीर कुरुडे, पर्यवेक्षक सदानंद नयळगे, शिवराज पवळे व इतर शिक्षक शिक्षिका या सर्वांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धा परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.