
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी नांदेड
नांदेड :- माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री , पालकमंत्री आमचे सर्वोसर्वा अशोकराव चव्हाण साहेब, यांच्या हस्ते जिल्हा परिषद नांदेड येथे माझ्या वडिलांना श्री.जनार्दन तुकाराम शेंबाळे यांना प्रगतीशील शेतकरी म्हणून बहुमान मिळाला. आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करून सन्मानित कण्यात आले,यावेळी उपस्थित नांदेड जिल्ह्याचे लाडके कलेक्टर विपीन इटंनकर साहेब,महापौर पावडे ताई, नांदेड दक्षिण चे भाग्यविधाते आदरणीय आमदार मोहन अण्णा हंबर्डे,महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर भाऊ राजूरकर, माजी पालकमंत्री आदरणीय डी.पी.सावंत साहेब,जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ.मंगाराणी अंबुलगेकर,कृषी सभापती बाळासाहेब पाटील, पशू संवर्धन सभापती, संजय आप्पा बेळगे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर मामा शिंदे आदी उपस्थित होते.