
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- पोलिस स्टेशनचे नवीन पोलिस निरीक्षक आर.एस.पडवळ साहेब यांचा मकरसंक्रांतिच्या दिवशी दैनिक चालु वार्ता पत्रकाराच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित दैनिक चालु वार्ता कंधार तालुका प्रतिनिधी माधव गोटमवाड,फुलवळ सर्कल प्रतिनिधी नरसिंग पेठकर,बहाद्दरपुरा प्रतिनिधी किरण कोकाटे उपस्थित होते.
तसेच पडवळ साहेब यांची रोखठोक मुलाखत घेण्यात आली.त्या मुलाखती दरम्यान पोलीस निरीक्षक पडवळ साहेब यांनी जनतेला आव्हान केले आहे की त्यांनी मास्क ,स्यानिटायझर चा वारंवार वापर करावे ,गर्दीची ठिकाणे टाळा,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर साहेब यांनी लावलेली संचारबंदी च कटोकर पालन करण्यात येत आहे असे पोलीस निरीक्षक आर .एस.पडवळ साहेब म्हणाले.