
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
नाही बडेजाव, नाही लवाजमा
नाही सोस प्रसिद्धीचा…
राहणी साधी, सामान्यांचा कैवारी
नको मिष्ठान्न, चटणी-भाकरी हातावरी…
नांदेड :- आपल्या धडडीच्या कार्यातून सामान्य लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आणि व्यवस्थेतील शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून काम करणारे, नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर साहेब, यांना आज प्रवासादरम्यान सामान्य माणसांसारखे हातावर चटणी-भाकरी खाताना पाहिले. हारतुरे,पत्रकारांचा गराडा, लाळघोट्या चमच्यांनी वेढलेले व्यक्तिमत्व, पेपर मधले मोठमोठे लेख-जाहिराती, मोठमोठे बॅनर फ्लेक्स आणि आपल्या न केलेल्या समाजसेवेचा बडेजाव मिरवणारे अनेक राजकारणी, तथाकथित समाजसेवक व पुढारी आपण आजवर पाहिले असतील, पण सातत्याने लोककल्याणाचा ध्यास घेऊन पायाला चक्री बांधल्यागत लोकहितास्तव फिरणारे व कुठलाही सोस न ठेवता प्रसंगी हातावर भाकरी ठेऊन खाणारे आमदारही आज आम्ही पाहिले…
सन्माननीय बालाजी कल्याणकर साहेब, आपल्या कार्यकर्तृत्वाला, लोकांप्रती असलेल्या कळवळ्याला व आपण सामान्य लोकांसाठी घेत असलेल्या परिश्रमाला आणि आपल्यातील साधेपणाला मनापासून सलाम…