
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी मेरा रेशन अँप लाँच केले आहे, या अँपच्या मदतीने रेशन कार्ड धारकांना रेशन कार्ड संबंधित सर्व कामे घरबसल्या करता येतील.
मेरा रेशन अँपद्वारे कोणकोणते लाभ घेता येणार?
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मेरा रेशन अँपच्या मदतीने रेशन कार्डसाठी नोंदणी करता६ येईल, तसेच रेशन कार्ड डाउनलोड देखील करता येईल.
रेशन कार्डधारकांना कोणकोणत्या वस्तू मिळत आहेत याची माहितीही घेता येईल, रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करता येईल.
याव्यतिरिक्त रेशन कार्डवर आतापर्यत किती धान्य मिळाले आहे, तसेच जवळच्या रेशन दुकानाची माहिती घेता येईल आणि रेशन डीलर बदलण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
रेशन कार्ड ट्रान्स्फर करणे – जर आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात राहण्यासाठी जात असाल तर आपले रेशन कार्ड मायग्रेशन किंवा ट्रान्स्फर देखील करता येणार आहे.
_खालील लिंक द्वारे तुम्ही मेरा रेशन ॲप डाऊनलोड करू शकता…_
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard