
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा :- बंद झालेल्या शाळांमधील आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यर्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून अशा विद्यार्थ्यांना नजिकच्या शासकिय अथवा अनुदानित शाळांमध्ये सामावून घेण्याचा शासनातर्फे आदेश काढण्यात आला आहे.
भंडारा शहरातील माईंडस् आईज इंटरनॅशनल स्कूल, अंकुर विद्या मंदीर व मोहाडी तालुक्यातील स्वामी अवदेशानंद पब्लिक स्कूल अशा तीन शाळा 2021-22 या शैक्षणिक सत्रात बंद झाल्या.
आरटीई 25 टक्के अंतर्गत या शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संदर्भात बराच संघर्ष केला. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनासुध्दा पालकांनी विद्यार्थ्यांवर अन्याय होवू नये यासाठी निवेदने दिली होती. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी यासंदर्भात शासन स्तरावर बराच पाठपूरावा केला. या पाठपूराव्याला यश आले असून बंद झालेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा अथवा अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याचे निर्देश शिक्षणाधिका-यांना देण्यात आले आहेत.