
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- पेनुर येथे राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या जयंतीनिमित्त व माननीय श्री संजय पाटील कऱ्हाळे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास व नेत्र तपासणी कार्यक्रमास 78 नेत्रतपासणी व 42 रक्तदान झाले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय पाटील कऱ्हाळे यांच्या हस्ते झाले . यावेळी उपस्थित राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष प्रल्हाद फाजगे,मनोहर पाटील भोसीकर, शिवराज पाटील पवार, राम पाटील पवार ,गुरु आप्पा धोंडे, बाबाराव पाटील गवते, रामदास पाटील गवते ,गंगाधर पाटील गवते ,बाळू पाटील गवते, सतीश पाटील गवते ,डॉक्टर डी एम लोकडे साहेब ,पेनुरचे सरपंच बाळू पाटील गवते, भारसवाड्याचे सरपंच नवनाथ हालगे ,माजी सरपंच पप्पू पाटील हालगे, अंतेश्वर चे सरपंच तुकाराम कऱ्हाळे ,राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष गजानन कऱ्हाळे ,ज्ञानोबा गवते, संतोष लोखंडे ,माधवराव चांदणे, बद्रीनाथ चांदणे ,मारुती एजगे, विनोद गवते ,मंगेश गवते, नारायण कऱ्हाळे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक दिपक पाटील कऱ्हाळे, शिवशंकर कऱ्हाळे, दत्ता लबडे, ओमकार लोखंडे, दिपक लोखंडे यांनी केले या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित लावली.