
दैनिक चालु वार्ता
मारोती कदम
जिजामाता यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जवळील देऊळगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव महालसा बाई ,जाधव वडिलांचे नाव लखुजी जाधव होते, लखोजी जाधव हे कुलीन मराठा होते, पूर्वीच्या काळी बालविवाह पद्धती होती ,त्यामुळे जिजाबाईंचा विवाह शहाजी भोसले यांच्याशी लहान वयातच झाला. शहाजी भोसले हे मालोजी भोसले यांचे पुत्र होते, मालोजी भोसले हे निजामशाहीच्या काळात जहागीरदार होते. मालोजी भोसले नंतर शहाजीराजांनी ही काही दिवस जहागीरदारी कारभार सांभाळला . त्या काळामध्ये महिलावर होणारे अनन्वित अत्याचार, दारिद्र्य ,शेतकऱ्यांची शेती विषयी ची तळमळ ,हे सर्व पाहून जिजाबाईंचे हृदय पिळवटून यायचे.
सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या एकमेव गुरु म्हणजे जीजामाता होत्या .जिजामातेने शिवाजी महाराजांना राम ,कृष्ण, शूरविरांच्या कथा सांगून देवदेवतांनी राक्षसांचा कसा निपात केला, तुम्हालाही तसाच अन्याय करणाऱ्या राज्यकर्त्यांचा नाश करायचा आहे हे बाळकडू जिजामातेने शिवाजी महाराजांना लहानपणीच पाजवले होते. जिजामातेचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते वीरमाता होत्या तशाच वीरपत्नी सुद्धा होत्या, जिजामातेला दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे ,घोड्यावर स्वारी करणे ,भालाफेक,युद्धकलेतील बऱ्याचशा निपून अशा गोष्टी माहीत होत्या .आणि शिवाजी महाराजांना पुणे येथील जहागिरीच्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टी जिजामातेने स्वतः शिकवल्या.
शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना आखल्या, त्याकाळात हिंस्त्र प्राण्यापासून बचाव करण्यासाठी लोक शेतीकडे फिरकायचे नाही, तेव्हा हिंस्त्र प्राण्याला ,लांडग्याला मारणाऱ्या लोकांना त्यांनी बक्षिसे ठेवली, प्रोत्साहन दिले शेती करण्यासाठी .मग शूर वीर मावळ्यांना तयार करून त्यांनी लोकांना शेती करणे विषयी प्रेरित केले बाल शिवाजीला स्वराज्याचे धडे शिकवले शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आद्यप्रवर्तक आद्यगुरु म्हणजे जिजामाता स्वत या जिजामातेने शिवाजी महाराजांना मावळ्यांच्या सोबतीने तुम्ही स्वराज्य निर्माण करू शकता अशी मनामध्ये ज्योत पेटवली. खऱ्या स्वराज्यसंकल्पक जिजाबाई जिजामातेने प्रत्येक संकटाच्या वेळी शिवाजी महाराजांना युक्तिवाद सांगितला.
स्वराज्याचे तोरणबांधण्यासाठी आई तुळजाभवानीचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत अशा पद्धतीची घोषणाही जिजामातेने केली होती. जिजामाता म्हणजे एक व्यक्ती नसून अष्टभुजा देवी म्हणायला हरकत नाही, कारण जेव्हा जेव्हा संकट यायचे त्या संकटाच्या काळात सह्याद्री पर्वतासारख्या खंबीर पणे संकट झेलायच्या शहाजीराजांच्या मृत्यूनंतर त्या तीळमात्र घाबरल्या नाहीत. त्यांनी शिवाजी महाराजांना सोबत घेऊन मार्गदर्शन करून अनेक किल्ले हस्तगत केले इतकेच नव्हे तर शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले होते तेव्हा एखाद्या सह्याद्री प्रमाणे त्यांनी स्वराज्याचा कारभार पाहिला जनतेला आधार दिला .
कोंडाणा किल्ला जिंकून घेत असताना धारातीर्थी पडलेल्या तानाजी मालुसरे यांच्या रायबांचे लग्न देखील जिजामातेने लावून दिले. शिवाजी महाराज यांच्या चरित्रामध्ये शिवाजी महाराजांची खरी प्रेरणा स्तोत्र, आधारवड ,मार्गदर्शक, जर कोण असेल त्यांनीही व्यक्त केले आहे की मी जिजामाते मुळेच घडलो अशा ह्या रणरागिनी जिजामाता यांच्या मुळेच आज सोळाव्या शतकापासून आजतागायत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येकाच्या ओठावर आहे . जिजामाते मुळेच आपल्या मराठी मातीचा ,मराठी भाषांचा ,मराठी माणसाचा ,स्वाभिमान जागृत राहिलेला आहे .
अशा या वीर मातेचा जन्मोत्सव कोरोणाच्या पार्श्वभूमीमुळे सगळीकडे नियम पाळून साजरा होत आहे. त्या काळामध्ये ज्या पद्धतीने जिजामातेने शिवाजी महाराजांना घडवले त्याच पद्धतीने आजच्या काळातील महिलांनी सुद्धा जिजामातेचा आदर्श घेऊन कोणत्याही संकटाला न घाबरता ,न डगमगता आपणही आपले जीवन व्यतीत करावे, छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्या तच नाही तर 16 व्या शतकातील स्त्रीला स्वातंत्र्य काय असते ते जिजामाते मुळेच कळाले. जिजामातेने बऱ्याचशा चालीरीती ,प्रथा ,परंपरा ,यांना छेद देऊन डोळसपणे समाजाने स्त्रीविषयी पाहिले पाहिजे , असा त्यांचा मानस होता अशा या वीर मातेने आपल्या आपल्या मुलांनाच नाही तर महाराष्ट्रातील बर्याचशा मावळ्यांना सुसंस्कृत बनवले स्वाभिमान मराठी बाणा काय असतो ते शिकवले आणि जिजामाता यांचे त्या काळातील सामाजिक ,शेती विषयक ,स्त्री विषयक ,विचार आजच्या स्त्रीने अंगी बाणवण्यासारखे आहेत.
त्यांनी त्या काळामध्ये अतुलनीय अवर्णनीय असे महान कार्य केले आणि अशा ह्या महाराष्ट्राच्या माऊलीचा मातोश्रींचा जिजाबाई १७ जून १६७४रोजी मृत्यू झाला. त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या मृत्यूपश्चात एवढेच म्हणावेसे वाटते की आज महाराष्ट्रातील तमाम महिला मंडळींनी जिजामातेचा आदर्श घ्यावा. एवढीच या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्वांना माझी विनंती राहील ,जिजामातेचे कार्य शब्दांमध्ये आपण व्यक्त करू शकत नाही ,त्यांच्या कार्याची महती, त्यांच्या कार्याचे गोडवे गीतातून, कथेतून, आणि ललित लेखातून प्रगट होत आहेत अशा या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन