
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर/पठारवाडी :- शिवसेनेचे माजी विधानसभा उपाध्यक्ष, माजी आमदार विजयराव औटी व कृषी व बांधकाम समिती सभापती, टाकळी ढोकेश्वर गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते सर यांच्या आग्रहास्तव पारनेर तालुक्यातील पाझर तलाव दुरुस्ती साठी जिल्ह्यातील सर्वाधिक निधी हा पारनेर तालुक्यात दिला असून यापुढील काळातही पारनेर तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या मोर्चेबांधणी साठी प्रयत्न करणार असून तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन मृदा व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मंत्री ना.शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.मी वयाच्या २४व्या वर्षी कारखान्याचा चेअरमन झालो.सहकारी संस्था चालविण्याचा कुठलाही अनुभव पाठीशी नसताना परंतु गडाख साहेबांच्या आशिर्वादाने व सर्व जनतेच्या पाठिंब्यामुळे मी सहकारात काम करण्यास यशस्वी झालो.सहकार संस्था चालवणे आणि ती उभी करणे एवढं सोपं नसतं,ते जबाबदारीने करावं लागतं असंही ते म्हणाले.
[२-३दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेय वादासाठी चढाओढ सुरू होती.पाझर तलाव दुरुस्ती साठी आलेला निधी आपल्याच पाठपुराव्यामुळे आला असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात होता.ना.गडाखांच्या दौ-यामुळे शिवसेनेच्या
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला असून विजयराव औटी व काशिनाथ दाते सर यांच्यामुळे निधी दिल्याचे ना.गडाख साहेबांनी सांगितले.]
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी होते.
या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, सभापती गणेश शेळके, पंचायत समिती सदस्य श्रीकांत पठारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पठारवाडी सरपंच उर्मिला सुपेकर, चेअरमन सुखदेव पठारे, संतोष सुपेकर, पिराजी पवार, बाबाजी तनपुरे, भास्कर सुपेकर, कुंडलीक पठारे, उपसरपंच जयसिंग पवार, शाखाप्रमुख बबन पवार, मारूती सुपेकर,बारकू सुपेकर, मोहन पवार, मोहन सुपेकर, गणेश पवार, गजानन सोमवंशी, विठोबा पवार,लहू बोदगे, निसार मोमीन, मारूती पठारे, जनार्दन पवार,दगडू सुपेकर,भाऊ पवार,भरत पवार, लक्ष्मण सुपेकर,आबा सुपेकर, संतोष सुपेकर, संदिप सुपेकर, पांडुरंग सुपेकर,बबन ससाणे, दत्ता कवाद,जवळा गावचे मंगेश सालके, बबनराव सालके,गोरख पाटील, गजानन सोमवंशी, डॉ.सोमेश्वर आढाव, सुभाष रासकर, सतीश रासकर, शिरिष शेलार, अशोक सालके, प्रदीप पठारे, जिल्हा बँकेचे इंद्रभान शेळके, कार्यकारी अधिक्षक प्रभाकर लाळगे, रंगनाथ गायकवाड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पिराजी पवार यांनी केले तर किसनराव सुपेकर यांनी आभार मानले.