
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर :- शासनाने सुरू केलेल्या उज्वला गॅस योजनेमुळे गोरगरिबांना केला जाणारा रॉकेल पुरवठा बंद करण्यात आला आहे. सिंलिडरची किंमत वाढल्यामुळे योजनेअंतर्गत देण्यात आलेले बहुतांश सिंलिडर शो पीस म्हणून घरात पडून नागरिक पुन्हा जळतनावर आले आहे. तर गरिबांची चूल व दिवाही बंद पडला आहे. गंगापूर तालुक्यात ऑगस्ट २०१९ पासून रॉकेल पुरवठा बंद करण्यात आला. एकूण २५१ स्वस्त धान्य दुकाना आहेत, लोकसंख्या नुसार दुकानावर रॉकेल पुरवठा केला जात होता. याच रॉकेलवर गरिबांची चूल व दिवाही पेटत होता शेतकरी सरपण पेटविण्यासाठी व शेतात जागल करण्यासाठी रॉकेलचा वापरा सर्रास करीत होते, मात्र गरिबांचे हक्काचे केरोसीन बंद करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चिमणी भर रॉकेल ऐवजी डीझेलचा सहारा घ्यावा लागत आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अठराविश्व दारिद्र्य अवस्था असलेल्या गोरगरीब जनतेच्या घरात चिमणीभर रॉकेल मिळणे दुरापास्त झाले आहे. एकंदरीत हाय टेक चूल पेटवण्यासाठी शासनाने गरिबांची चूल बंद केली. सदरील चूल पुन्हा पेटवण्यासाठी शासनाने रॉकेल पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी साम्राज्य ग्रुपचे अध्यक्ष जुबेर लालखा पठाण, उपाध्यक्ष अरबाज शाह, रिजवान खान, शारिक सय्यद, सुरज शिंदे, इम्रान खान, अजय खरात यांनी निवेदनाद्वारे केली.