
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा येथील पंचायत समिती कार्यालयात प्रभारी गटविकास अधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ऑफिस वेळेआधीच कर्मचारी घरी जात आहेत. कार्यालयातील टेबल रिकामे असून उपस्थित विस कर्मचाऱ्यांपैकी पाच वाजेच्या वेळेत फक्त पाच कर्मचारी हजार होते. राज्य शासनाने पाच दिवसाचा आठवडा केला असून ऑफिस वेळेत बदल केला. सकाळी ९:४५ ला ऑफिस वेळ चालू होते व ६:१५ ला ऑफिस बंद होते. लोहा पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना वेळेचे भान नाही. कर्मचाऱ्यांच्या मनी आले की ऑफिस चालू आणि बंद करणे चालू आहे.
पंचायत समिती कार्यालयात एकूण ३४ कर्मचारी आहेत. त्यापैकी सहा ते सात कर्मचारी पुर्ण वेळ उपस्थित राहतात बाकीचे कर्मचारी आपापल्या सोयीनुसार कार्यालय चालवतात त्यांच्यावर गटविकास अधिकारी यांचे अंकुश किंवा नियोजन नाही.चिरीमिरी घेतल्या शिवाय कोणतेही काम करत नाही. लोहा तालुक्याचा विस्तार खुप मोठा आहे. ग्रामीण भागातील जनतेचे कामे वेळेवर व्हावे म्हणून मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर ह्या खुप मेहनत घेत असून जनतेचे कामे वेळेवर करणाच्या सुचना वारंवार कर्मचाऱ्यांना देत आहेत. परंतु मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला लोहा पंचायत समिती कार्यालयाकडून केराची टोपली दाखवली जात आहे.
ग्रामीण भागातील जनतेचे कामे वेळेवर होत नसून एका कामासाठी अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या अनेक तक्रारी असून वेळेवर हजर न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मुख्यकार्यकारी अधिकारी कार्यवाही करतात. की हे प्रकरण दडपून टाकले जाते याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. लोहा पंचायत समिती मध्ये वेळेआधी २० पैकी १५ कर्मचारी हजर नसल्याचे माहिती माहिती गटविकास अधिकारी यांना दिली असता हजर नसलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन योग्य ती कार्यवाही करणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी शैलेश वावळे यांनी फोन वरुन दिली.
गटविकास अधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनामुळे तालुक्यातील बेरळी, मस्की, पळसी, रायवाडी आदी गावात ग्रामसेवक नियमबाह्य कामात करत असल्याच्या तक्रारी आल्या पण ग्रामसेवकाविरोधात कार्यवाही करण्याऐवजी गटविकास अधिकारी ग्रामसेवकांना बढावा देत असल्याची चर्चा तालुक्यात आहे.