
दैनिक चालु वार्ता
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी :- प्रदीर्घ कालावधीनंतर आटपाडीत साकारणारे पत्रकार भवन राज्यात आदर्श ठरेल आणि या कामासाठी आवश्यक सर्व मदत करू अशी ग्वाही आ.अनिल बाबर यांनी दिली.
आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघ भवन भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.आमदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवनाचे भूमिपूजन अनिलराव बाबर यांच्या हस्ते आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील,सरपंच वृषाली पाटील,तहसिलदार बाई माने , पोलीस निरीक्षक शरद नेमाने, पं.स.शाखा अभियंता देवांग, सा.बांधकाम शाखा अभियंता बुर्ले एस.पी.सर्व पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी बाबर म्हणाले की तालुका पातळीवर आटपाडीत साकारणारे पत्रकार भवन हे राज्यात आदर्श ठरावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. पत्रकार भवन ही नुसती वास्तू न उभारता त्याठिकाणी पत्रकारीतेचा व तालुक्यातील जडण घडणीचा इतिहास व मार्गदर्शन करणारे ग्रंथालय व अन्य सुविधाही आवश्यक आहेत.त्यासाठी निधीची उपलब्धता केली जाईल . पत्रकारांनी काम करताना समोरच्या व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यावी मात्र त्यावेळी जखम होऊ नये याची काळजी घावी .टेंभू योजनेसाठी जो संघर्ष झाला तो सर्वांना माहीत आहे. मात्र पत्रकारांची अपेक्षा असेल तर तो आत्मचरित्रात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करू.
आगामी काळात आटपाडीत गदिमा नाट्यगृह व अन्य कामांची लवकरच सुरवात होईल .शेतीच्या दृष्टीने काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांनीही काम केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून भवनाच्या बांधकामा बाबत दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकारी वर्गास दिल्या. तानाजीराव पाटील यांनी पत्रकार भवनाची मागणी पत्रकारांनी अनेक वर्षे अनेक नेत्यांकडे केली.पण ती अनिल भाऊंच्या सहकार्याने पूर्ण करता आली याचे समाधान आहे. खऱ्या अर्थाने आज पत्रकार दिन साजरा होत असल्याचे सांगितले.
लोकशाही मध्ये सर्वांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र समोरच्यावर टीका करताना अगोदर आपली पात्रता तपासली पाहिजे . पत्रकारांनीही टीका करणाऱ्याची पात्रता तपासून त्यांना महत्व दिले पाहिजे.आगामी काळात अनिल भाऊंच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागत प्रास्ताविकात संघाचे अध्यक्ष किशोर पुजारी यांनी आ.बाबर,तानाजीराव पाटील,सरपंच सौ.वृषाली पाटील यांच्या बहुमोल सहकार्याने भवन उभारत असल्याची भावना व्यक्त करत पत्रकारांच्या वतीने आभार व्यक्त केले.सूत्रसंचालन लक्ष्मण सरगर यांनी केले.आभार सुरज मुल्ला यांनी मानले.
कार्यक्रमास साहेबराव पाटील, संतोष पुजारी,दिघंची सरपंच अमोल मोरे,बाळासाहेब होनराव,मुन्ना तांबोळी,अँड धनंजय पाटील,राजेश नांगरे,कॉंग्रस तालुकाध्यक्ष डी.एम. पाटील,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मुजु तांबोळी,सचिव प्रशांत भंडारे, कार्याध्यक्ष लक्ष्मण सरगर , सर्व पत्रकार बांधव व मान्यवर उपस्थित होते .
8 आटपाडी फोटो :1
आटपाडी येथे आमदार निधीतून उभारण्यात येणारया पत्रकार भवनाच्या कामाचा शुभारंभ करताना अनिलराव बाबर,तानाजीराव पाटील, वृषाली पाटील,किशोर पुजारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.