
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- देगलूर तालुक्यातील हानेगाव गावातील सामान्य गोरगरीब वयोवृद्ध विधवा महिला अशा अनेक नागरिकांना स्वस्त धान्य मिळत नसल्याचे टाहो ऐकताच जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी दिलीप बंदखडके व उपसरपंच मुजीपोदीन चमकूडे यांनी गरीब कार्डधारकांना न्याय देण्यासाठी उपोषणाचा इशारा देत मैदानात उतरले असून निवेदन करतात याचे प्रश्न सोडवण्यासाठी महसूल प्रशासन कितपत मदत करणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊन मागील अनेक वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार यांचा काळाबाजार चालू आहे आणि गाव येथील काढ धारकांचे एक ना एक समस्या आहेत.
परंतु समस्या जाणून घेणार कोण हाणेगाव येथील तलाठी यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे महिन्याला वेळेवर धान्य मिळत नाही. साखर दाळ मिळत नाही पावती मिळत नाही पूर्ण धान्य मिळत नाही मोफत धान्य मिळत नाही राज्याचे ठाकरे सरकार व देशाचे मोदी सरकार कडून गोरगरिबांना मोफत धान्य जाहीर केले तरीही मोफत धान्य कोण गिळंकत आहेत असा प्रश्न या ठिकाणी चर्चेला जात आहे गावातील स्वस्त धान्य दुकाने हे गावाच्या कडेला आपल्या घरात चालवीत असल्याने वयोवृद्ध कार्डधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या सर्व अडचणी तलाठी मंडळ अधिकारी यांना कळविण्यात आले होते मात्र सर्व एकाच माळेचे मणी असल्याने गरीब जनतेसमोर जगावे की मरावे असे संकट निर्माण झाले आहे .
वयोवृद्ध लाभार्थ्यांना न्याय हवा. 5 जानेवारी रोजी तपासणीचे पत्र देऊन तपासणी झाली नाही या दिवशीचा रोष आहो कळकळ येथील लोकप्रतिनिधी पत्रकार बांधव गावकरी वर्ग यांनी प्रत्यक्ष अनुभवली आहेत यामुळे गरीब कार्डधारकांना व वयोवृद्ध लाभार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी आणि गाव जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी दिलीप बंदखडके उपसरपंच मुजिपोदिन चमकुडे व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी तारीख 24 जानेवारी रोजी हाणेगाव येथे उपोषण करण्याचा इशारा दिला असून या उपोषणाला बसणाऱ्या लोकांना प्रशासन गरिबाचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणार का अशी चर्चा हाणेगाव भागात चालू आहे.