
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
लोहा :- जि.प.प्रा.शाळा पांगरी येथे मागील शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे covid-19 चे सर्व नियमांचे पालन करून शासनाच्या निर्देशानुसार पालकसभा घेऊन नवीन शालेय व्यवस्थापन समिती पुर्नगठित करण्यात आली प्रथमतः सर्व पालकांची उपस्थिती नोंदवून पालक सभेमधून चर्चा करून सर्वानुमते शालेय शिक्षण समिती मध्ये घेण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार संवर्गनिहाय नावे सूचित करण्यात आली व घोषित करण्यात आली.
एकूण तेरा सदस्यांची समिती गठीत करण्यात आली यात नऊ पालक, एक शिक्षणप्रेमी नागरिक, एक ग्रामपंचायत सदस्य, एक शिक्षक प्रतिनिधी व सचिव म्हणून मुख्याध्यापक यांची नावे घोषित करण्यात आले सदरील घोषित नऊ पालक सदस्यांमधून अध्यक्ष पदी श्री.भरत विठ्ठल पवार तर उपाध्यक्ष पदी श्री.गणेश धोंडीबा बुद्रुक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सदस्य म्हणून ग्रामपंचायत सरपंच भारत बाबाराव कोपनर,उपसरपंच माधव खुशालराव पाटील, शेषराव श्रीरंग बुद्रुक, गंगाधर नागोराव बुद्रुक,गोविंद व्यंकटी बुद्रुक,साईनाथ बळीराम बुद्रुक,गोविंद साहेबराव गायकवाड,सुरेश काशिनाथ हंकारे,इरबा नारबा मेने,हरिदास प्रभू बुद्रुक,आणि सचिव म्हणून मुख्याध्यापक श्री बटलवाड सर यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित मारुती भगवानराव पाटील तंटामुक्ती अध्यक्ष, शिवाजी अण्णा राव बुद्रुक माजी सरपंच ,विलास साहेबराव सूर्यवंशी, लहू बुद्रुक, महेश मारुती बुद्रुक,ईरबा रामराव बुद्रुक,रामदास धोंडिबा बुद्रुक व गावातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.