दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी जळकोट ग्रा.
हानमंत गिते
जळकोट: महात्मा फुले ग्रामीण विकास सेवाभावी संस्था सोनवळा चे संस्थापक मा. श्री चंदन श्रीहरी पाटील यांचा वाढदिवस सर्व संकुलातील कर्मचाऱ्याच्या वतीने साजरा करण्यात आला, त्यावेळी सर्व कोरोणाचे नियम पाळण्यात आले, सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून, व्यवस्थित अंतर ठेवून, वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी संस्थेतील महात्मा फुले अध्यापक महाविद्यालय जळकोट चे प्राचार्य कळसे सर, महात्मा फुले पब्लिक स्कूलचे प्राचार्य बिरादार सर, रामकृष्ण विद्यालय देवळाची वाडीचे मुख्याध्यापक दामले सर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कंधार येथील प्राचार्य ननागरगोजे सर, संभाजी माध्यमिक विद्यालय वाढवणा चे प्राचार्य पाटील सर, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी, निवासी वस्तीग्रह, पालक वर्ग, सोनवळा चे सरपंच राहुल सूर्यवंशी, उपसरपंच पांडुरंग सूर्यवंशी, सर्व सदस्य,आरपीआयचे अध्यक्ष बालाजीराव गवळी, आदी उपस्थित होते.
प्रथमतः संकुलातील सर्व कर्मचाऱ्यांनी चंदन श्रीहरी पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर त्यांचे ऑक्शन श्रीमती चोले मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. वाढदिवसानिमित्त महात्मा फुले नर्सिंग कॉलेज जळकोट चे प्राचार्य माधव वाघमारे सर यांनी गीत व पोवाडा सादर केले त्यानंतर माननीय श्री श्रीहरी पाटील यांनी सर्वांना मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी प्रथमता सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले,सर्व कर्मचार्याना कौतुकाची थाप दिली तसेच शासन निर्णयाप्रमाणे एन टी सी मधील धनगर, हटकर, बडगर यांना पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण विनामूल्य आहे हा मेसेज सर्व NTC मधील सर्व पालकांपर्यंत पोहोचवा असे कर्मचाऱ्यांना सांगितले. जास्तीत जास्त गरिब विद्यार्थ्यांचे प्रवेश करून त्याची प्रगती करा असा मोलाचा सल्ला उपस्थिताना दिला.