
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
परतूर :- शहरात शुक्रवारी ता.14 रोजी मकरसंक्रांतीचा सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला.
महिलांनी एकमेकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देत ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असा स्नेहमय संदेश देऊन नाते वृद्धिंगत करण्यात आले. भारतीय संस्कृतीत या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. इंग्रजी महिन्यानुसार वर्षातील पहिला सण मकरसंक्रांत असल्याने याप्रती असलेली उत्सुकता दिसून आली. शहरातही पारंपरिक पद्धतीने ही प्रथा पार पाडत संक्रांत पार पाडली गेली. एकमेकींना वाण देण्यासाठी सुवासिनींना या सणाचे खास आकर्षण असते.महिलांनी सुगड्याचे वाण देण्याची पारंपरिक प्रथा त्यांनी पार पाडली.
…………………
फोटो-परतूर येथे संक्रांतीनिमित्ताने स्नेहल गिरी ने काढलेली रांगोळी दिसत आहे.