
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई : मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नाही हे आम्ही समजू शकतो. देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात त्यावेळी केंद्राशी काही तरी मागणी अपेक्षित होती. मात्र, पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहतात आणि एका अॅपच्या उद्घाटनासाठी उपस्थितीत राहतात. मग 10 ते 12 तासात अशी काय जादूची कांडी फिरली की त्यांची प्रकृती ठणठणीत होते आणि ते महापालिकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. हे सरकार अहंकारानं भरलेलं आहे. समन्वयातून विकास करायचा असतो. केंद्रीय आरोग्यमंत्री आढावा घेतात तेव्हाही राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री उपस्थित राहत नाहीत, हे दुर्दैवं आहे, अशी घणाघाटी टीका प्रवीण दरेकर यांनी केलीय.
Vपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती.मात्र, आजारी असल्याचं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थिती नव्हते. तर ठाकरे यांच्याऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधानांच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर आज मुंबई महापालिकेच्या ‘ व्हॉट्सअप चॅट बॉट’ या सुविधेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. याच मुद्द्यावरुन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सवाल केलाय.