
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
सातारा :- सध्या राज्य सरकार विरोधात केंद्र सरकार असे राजकारण चालू आहे. महाविकास आघाडीचे नेते व मंत्री पोलीस यंत्रणेचा माध्यमातून व भाजपचे नेते व मंत्री,ईडी, सीबीआय, एनआयए व केंद्रातील विभागामार्फत एकमेकांना त्रास देत उणीदुणी काढण्याचे काम चालू आहे. यात सर्वसामान्यांनी काय बोध घ्यावा, असे हेमंत पाटील म्हणाले. राज्य सरकारमधील विविध खात्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारमधील भ्रष्टाचार का दिसत नाही? असा सवाल भारत अगेन्स्ट करप्शनचे हेमंत पाटील यांनी केला आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीविरोधात आरोप करायला सांगितले आहे. महाविकास आघाडी व भाजप सरकार हे लोकांची दिशाभूल करून गैरसमज पसरवून निवडणुकीत मतदानाची झोळी भरून सत्ता स्थापन करण्याचा नादात असल्याचे दिसून येत आहे; परंतु राज्यातील व देशातील भ्रष्टाचार कसा कमी करता येईल व त्यावर कसे नियंत्रण ठेवता येईल, याबाबत पोलीस काहीच बोलत नसल्याची खंत हेमंत पाटील यांनी बोलून दाखविली.