
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधि
मारोती कदम
लोहा :- १२जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा कलंबर खुर्द तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे विवीध कार्यक्रम करून साजरा करण्यात आला.दुपारी 12.वाजता जिजाऊ पूजन व जिजाऊ वंदना घेण्यात आली. या सोहळ्याचे उद्धाटन माननीय . डी. देवकते साहेब स.पोलीस नि. उस्माननगर, श्री बाळासाहेब थोरे साहेब पीएसआय,श्री. गणेश लोखंडे सकाळ, श्री देविदास डांगे वार्ताहर. माली पाटील पत्रकार मोठी लाठ ,हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोज क. शिवश्री सुरेश पाटील घोरबांड गुरुजी यांनी मान्यवरांचे जिजाऊ पुस्तिका आणि झाडाचे रोपटे पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते शिवश्री पंडित पवळे सर यांचे भाषण झाले ,ते म्हणाले की मुलं मुलींना खूप शिकवा व्यसणापासून दूर करून आधुनिक काळात बदल करून काळा बरोबर चालले पाहिजे. शाळेतील शिष्यवृत्तीधारक मुलीचा सत्कार करण्यात आला.
संयोजक सुरेश पाटील घोरबांड यांनी गावासाठी मी माझे सामाजिक कार्य मोठ्या संख्येने पुढे घेऊन जात आहे ,सर्वांनी सहकार्य करावे थोड्याच दिवसात भव्य एम.पी.एस. सी. अकॅडमी आणि. ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याचा माझा मानस आहे,यास आपण साह्य करावे असे ते म्हणाले.शेवटी आभार. श्री नागठाणे सर यानी मानले व राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.त्यानंतर सर्व जमलेल्या नागरिक तरुण आणि महिला यांना जिजाऊ भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.