
दैनिक चालू वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :- देगलूर-बिलोली मतदार संघातील कार्य कुशल व्यक्तीमत्व, प्रत्येक व्यक्तीला आपलसं वाटणार नेतृत्व, आमदार जितेशभाऊ रावसाहेब अंतापुरकर यांची या मातीशी जुळलेली नाळ वेळोवेळी दिसुन येते. असाच हा प्रसंग अचानक कार्यक्रमचा दौरा असताना अचानक गाडीसमोर काही लहान मुलं आली आणि त्यांनी तीळगुळ घेऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या, त्यांच तो उत्साह कदाचीत आमदार जितेशभाऊंना देखील उर्जा मिळत असावी.
क्षणाचाही विलंब न करता तेही गाडीतुन खाली उतरून केंव्हा त्यांच्यात गप्पा रंगल्या कळलच नाही.आणि अचानक थांबलेली गाडी पाहुन गावातील जेष्ठ नागरिकांनीही लगेचच भेट दिली क्षणार्धात न ठरवता गप्पाही रंगल्या, त्यांच्या चेहऱ्यांवरील भावच सांगत होता की किती घट्ट नातं एकमेकांशी जुळलेलं आहे.
स्व.आ. रावसाहेब अंतापुरकर साहेबांच्या संस्काराची शिदोरी कायमच जपत आलेत. सर्वसामान्यांना आपलसं वाटणार आपल हक्काच माणुस आमदार जितेशभाऊ रावसाहेब अंतापुरकर.हीच सदभावना प्रसंगातून दिसून येते.