
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे :- ज्याप्रमाणे सूर्याचे स्थान अढळ आहे त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान संपूर्ण विश्वात आढळ असून त्यांनी मानवतेसाठी कार्य केले. मागास मराठवाड्यात त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून शिक्षणाचा पाया रोवला. त्यामुळेच शैक्षणिक विकास झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध होत होता. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वच स्वीकारत असून नामविस्तार करण्यात आला. नामांतर आंदोलनातील लढ्यातील शहिदांना अभिवादन करून बार्टीचे महासंचालक धम्म ज्योती गजभिये यांनी नामांतर लढ्यातील शहिदांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे येथे दि, १४ जानेवारी २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये हे होते.
यावेळी इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, पुणे, स्मिता राऊत, सहाय्यक लेखाधिकारी, राजेन्द्र बरकडे, सहाय्यक लेखाधिकारी यांच्या सह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . शिल्पा शिवणकर, प्रकल्प अधिकारी, सुनंदा गायकवाड, प्रकल्प अधिकारी , प्रदिप भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सूत्रसंचालन रामदास लोखंडे यांनी केले.