
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- सावित्रिबाई फूले ते राजमाता जिजाऊ सन्मान महाराष्टट्राच्या लेकीचा या उपक्रमाअंतर्गत आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची 424वी व 159 वी जयंती महात्मा फूले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेकापूर येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. तारामतीबाई संभाजीराव केंद्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या, प्रमूख अतिथि संस्थेचे सचिव तथा शेकापूर नगरीचे मा.सरपंच मा. शिवाजीराव पा.केंद्रे व संस्थेच्या सह सचिव सौ. रेखाताई शिवाजीराव केंद्रे ह्या होत्या प्रमूख पाहूणे प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे उपाध्यक्ष नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ नांदेड,पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे,सांक्रतीक विभाग प्रमूख रामराव वरपडे सर उपस्थित होते.
प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांनी सूंदर मार्गदर्शन केले ते म्हणाले विद्यार्थांनी आपल्या जिवनात संघर्ष करून आपले ध्येय साध्य केले पाहीजे व या जयंती निमित्य या महामानवांचा एक तरी गूण अंगीकारावा असे ते म्हणाले. यावेळी शंभर हुन अधी मुल व मुलींनी अनेक विद्यार्थांनी भाषणे केली, पाळणा गायीला,एकपात्री नाटक केले,शिक्षका मधून सौ इप्पर मॅडम यांनी विद्यार्थांना प्रेरणा देणारे भाषण केले, शेवटी सहसचिव सौ रेखाताई केंद्रे यांनी समारोपाचे भाषण केले, व मुलींनी सुरेख भाषण केल्याबदल कौतुक केले तर या कार्यक्रमा अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सुञसंचलन कु.स्वरूपा मारोती वाघमारे यांनी केले व आभार कु.पुजा गणेश निलेवाड यांनी मांडले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यंकटराव पुरमवार सर ,प्रा.आरूण केदार सर , सौ.सुनिता इप्पर मँडम ,मोहीत केंद्रे सर ,शेख एम.एम. ,प्रा.सौ.स्वाती रत्नगोले मँडम ,लोंड आमित सर ,पडलवार सी.टी.सर ,मेंडके शिवाजी सर ,प्रा.गुट्टे ए.टी.सर ,बोईवार आनिल सर ,बोराळे महेद्र ,पञकार एस.पी.केंद्रे , प्रा.देविदास जायभाये , प्रा.गिरीश नागरगोजे , प्रा.गोविंद राठोड , प्रा.हाणमंत भालेराव ,प्रा.नागरगोजे मोतिराम , प्रा.विजय राठोड ,किशन ठोंबरे सर , प्रा.पंकज पाटील आदिसह उपस्थीत होते.तर वंदेमातरम गिताने सांगता करण्यात आली .