
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर :- गंगापूर नगरपालिके अंतर्गत शहरातील विविध चौकांत सुशोभीकरण करण्यात आले. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील उद्यानात चबुतरा तयार करण्यात आला. यामध्ये हिंदुसूर्य महाराणा प्रताप चौक लासुरनाका छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या तिन चौकांत सुशोभीकरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजमुद्रा बसवून तिचे लोकार्पण आमदार प्रशांत बंब, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य किशोर धनायत, नगराध्यक्षा वंदना प्रदीप पाटील, माजी बांधकाम सभापती संतोष जाधव, यांच्या हस्ते करण्यात आले, तर स्व. राजीव गांधी चौक कामाची पाहणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील नियोजित पुतळा चबुतराचे व संरक्षण भिंत लोकार्पण करण्यात आले . तसेच श्री संत शिरोमणी सावता महाराज सभागृह कायगाव रोड,राजवाडा येथील स्मशानभूमी ,राजवाडा येथील चावडी ,व श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच मजलिस बैतुलमाल सभागृह उद्घाटन करण्यात आले.