
दैनिक चालु वार्ता
चंद्रपूर प्रतिनिधी
प्रदिप मडावी
चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अवकाळी पावसाने कहर माजविलयाने जिल्ह्यातील शेतकर्यांचे शेतमाल पाऊसात ओलेचिंब होऊन मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याची बाब आता समोर आली आहे. रबी हंगामात शेतकरयानी यंदाच्या साली धान कापुस हरभरा गहु लाखोली उडीद मुंग तुळी इत्यादी पिके शेतात लावली होती. शेतात पिके बहरून येऊन जास्तीत जास्त उत्पादन होण्याच्या हेतूने आशा आकांक्षा पेलविलया गेल्या परंतु निसर्गाची अवकृपा होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतमालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात भरडल्या गेला आहे. उभ्या पिकांचे नुकसान सोसावे लागल्याने शेतकरी वर्ग हताश होऊन हवालदिल झाल्याचे निदर्शनास येत आहे. तेव्हा शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून पिकांचे सर्वेक्षण करण्यात यावा व तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावा अशी मागणी जिल्हातील शेतकरयाकडुन केली जात आहे.