दैनिक चालु वार्ता
पन्हाळा प्रतिनिघी,शहाबाज मुजावर
किल्ले पन्हाळगड प्रदक्षिणा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या अतिपावसामुळे पन्हाळा किल्ल्यासह परिसरातील अनेक ऐतिहासिक वास्तूंना त्याच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. बऱ्याच वास्तूंची पडझड होत आहे. अशा ऐतिहासिक वास्तूं काळाच्या उदरात गुडूप होण्याआधी इतिहासप्रेमींना अनुभवता याव्यात यासाठी पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा व करवीर ट्रेकर्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले पन्हाळगड प्रदक्षिणा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
पन्हाळा परिसरातील समाधी मंदिरे, ऐतिहासिक वाडे, किल्या चे दरवाजे धान्यकोठारे,भव्य आशा वास्तु आदी शिल्प, फारसी- संस्कृत शिलालेख, बांधीव विहिरी, नानाविध मुर्त्या, सभोवताली असणाऱ्या बाजारपेठांना जोडणारे फरसबंदी मार्ग आदींच्या इतिहाची ससंदर्भ मांडणी पर्णाल इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक शिवप्रसाद शेवाळे यांनी यानिमित्ताने केली. तसेच पन्हाळगडाचे भौगोलिक महत्त्व मोहिमेचे आयोजक स्वप्नील पाटील यांनी विशद केले. यावेळी शिवप्रसाद शेवाळे, स्वप्नील पाटील, मृणाली शेटे, सतीश जाधव, रणजित शिपुगडे, शुभम कुंभार, ऋतुराज पाटील आदी मंडळाचे कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात इतिहासप्रेमीं उपस्थित होते.
पन्हाळा परिसरातील ऐतिहासिक वारसा स्थळांना वाढत्या नैसर्गिक अन मानवनिर्मित आपत्तीमुळे धोका निर्माण झाला आहे. अशावेळी त्यांचे दस्ताऐवजीकरण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पर्णाल इतिहास संशोधन मंडळ कार्य करत आहे.अशी माहिती दैनिक चालु वार्ता ला पर्णाल इतिहास संशोधन मंडळाचे अघ्यक्ष शिवप्रसाद शेवाळे यांनी दिली.