
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कौठा सर्कल
एस.डी.बोटेवाड
कंधार :- कंधार व लोहा तालुक्यात अनेक महापुरुषांचे स्मारके निर्माण करुन आदर्श समाजापुढे ठेवणारे,देशाची लोकसभा असो का महाराष्ट्र विधानसभेत आपल्या कार्याचा ठळक ठसा उडविणारे,शिवप्रेमी, महाराष्ट्राचे शिक्षण महर्षी,विद्रोही विचारवंत, सुग्या-मुग्याचे कैवारी,जागतिक गुराखी साहित्य संमेलन व लोकनाट्य संमेलनाचे संयोजक, हम सब एक हैं,गुराखीपिठाचे निर्माते,ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी बळीराजा मार्केट यार्ड तत्कालीन आमदार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी बळीराजा मार्केट यार्ड स्थापन केला.
या मार्केट यार्डचे पहिले चेअरमन डाॅ.नंदकुमार हेमराजनी यांच्या कार्यकाळात छ.शिवप्रभुच्या चौकाची निर्मिती करुन डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी छ.शिवप्रभुंचा आश्वारुढ पुतळा बसविण्याचा ठराव मांडून एकमतांनी निर्णय घेण्यात आला होता लोहा शहराला नगर परिषद दर्जा प्राप्त झाल्यानंतर पहिले नगराध्यक्ष दिवंगत माणिकराव पाटील पवार यांच्या कारकिर्दीत ऐतिहासिक शिवाजी चौकात गोलाई निर्माण करुन त्या ठिकाणीच छ.शिवरायांच्या आश्वारुढ पुतळ्याची नियोजित जागा असा लोखंडी बोर्ड ऑईल पेंटींग करुन लावला.हे एवढे सूर्य प्रकाशा इतके स्वच्छ सत्य असून राजकिय स्वार्थापोटी सत्ते मदमस्त होवून आयत्या पीठावर रांगोळी काढण्या केविलवाणी प्रयत्न हास्यास्पदच आहे.
सतत ११ दिवस मे महिन्यातील रखरखत्या उन्हात तिव्र उष्णतेची लाट सोसत आपल्या वाढत्या वयाची तमा न करता,शिव सत्याग्रहातून माघार घेतली नाही. तत्कालीन नगर परिषद लोहा त्यावेळेस तत्कालीन कंधार-लोह्याचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांच्या सांगण्यावरुनच शिवप्रभुंचा पुतळा भेट म्हणून स्विकारण्यास नगर परिषदेने असमर्थता दर्शवली.त्यावेळेस शिवप्रभुंच्या पुतळ्यास नव्हे प्रत्यक्ष छ.शिवप्रभुंना विरोध करतांना राजकिय पोळी भाजुन घेण्याचे षडयंत्र आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.
आता बेगडी शिवभक्ती दाखवणारे भुतपुर्व केलेला शिवप्रभुंचा व्देश स्मारकाचे भुमीपुजन करुन पुसल्या जाणार कसे?असा प्रश्न लोहा-कंधार तालुक्यासह जिल्हाभर विचारला जात आहे.त्यावेळी जर लोहा नगर परिषदने शिवप्रभुंचा आश्वारुढ पुतळा स्विकारला असता तर हा चौदा वर्षाचा बंदिसस्तवास माझ्या श्रीमान योगी शिवरायांच्या पुतळ्यास सोसावा लागलाच नसता! आश्वारुढ जाणता राजांचा पुतळा स्विकारण्यास नकार देवून छ.शिवप्रभुवर सत्तेच्या ताकदीवर अन्याय केला त्या वेळी लोहा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उप अभियंता चावरे साहेब यांनी प्रत्यक्ष लोहा येथील शिवाजी चौकात येवून पाहणी केली.
त्यांनी शिवरायांचा पुतळा बसविला त्या चबुतऱ्यास चक्क पायाने ठोसरुन अपमास्पद वागणूक दिली.या घटनेचा डाॅ.भाईंनी व उपस्थित सर्व शिवप्रेमीनी तिव्र शब्दात धिक्कार केला.ऐतिहासिक लोह्याच्या शिवाजी चौकात पोलिस निरीक्षक परांडे साहेब यांच्या अधिपत्याखालील पोलीस स्टेशन लोहा मार्फत पोलीसांची जादा कुमक जिल्ह्यावरुन मागवून अक्षरशः छावणीचे स्वरुप लोहा शिवाजी चौकात निर्माण केले.एस.आर .पी.च्या गाड्या तैनात केल्या.शस्त्रधारी पोलीसांचा गराडा कायम स्वरूपी लोहा शिवाजी चौकात वाढवण्यात आला. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ११ दिवस भर उन्हा-तान्हात तप्त पारा सोसत वयाच्या नव्वदीत असलेला चीरतरुण छ.शिवरायांचे भक्त डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब महाराष्ट्राचे अराध्य दैवत या आदर्शांचे स्मारक उभारण्यासाठी सत्याग्रह केला.
तोही कोणतेही गालबोट न लावता व निष्पाप सत्याग्रही वीरांचा बळी जाणार नाही याची दक्षता तात्काळ घेवून डाॅ.भाई साहेबांनी नांदेड येथील जिल्हाधिकारी राधेश्याम मोपलवार साहेब व पोलिस अधिक्षक फत्तेसिंह पाटील या दोघांची त्यांच्या कार्यालयात जावून प्रत्यक्ष भेट घेतली.त्यावेळेस डाॅ.भाई साहेबां सोबत डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे,भाई किशनराव पा.ढगे, प्राचार्य डाॅ अशोकराव गवते,व्ही.जी.चव्हाण, शशीकांत जोगदंड आदी सोबत होते.प्रत्यक्ष जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख या संदर्भात डाॅ.भाई साहेबांनी आपली भुमिका सविस्तर मांडून शेवटी नांदेडसूनच लोहा शिवाजी चौकातील पोलीस बंदोबस्त काढुन घेतला.
लोहा चौकातून दोन राष्ट्रीय महामार्ग जात असल्यामुळेच शासनाच्या सुधारित पत्रकानुसार रितसर आवश्यक असलेली अटीची पुर्तता करुन त्याच चौकात शिवप्रभुंचा भव्य आश्वारुढ पुतळा सहमतीने बळीराजा मार्केट एरियात ठेवावा असा पर्याय काढला.लोहा येथील शिवस्मारक स्मारक समिती स्थापन करून याच शिवाजी चौकात भव्य शिवस्मारक करुन आश्वारुढ पुतळा उभारण्याचे ठरले. हा पुतळा लोहा चौकात डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांना शिवप्रभुंचा आश्वारुढ पुतळा उभारल्या बदल सा.बांधकाम विभागाच्या वतीने डाॅ.भाई साहेब व त्यांच्या २० सत्याग्रही वीर यांचेवर गुन्हा दाखल केला.
लोहा सन्मानीय कोर्टात अनेक पेशा होवून लोहा कोर्टाने डाॅ.भाई सह सर्व सत्याग्रह वीरांची निर्दोष मुक्तता केली.तेंव्हा निर्माण झालेले ऐतिहासिक शिवाजी चौक लोहा मोडवर १ मे २००७ च्या महाराष्ट्र दिनी उन्हाच्या खाईत सलग ११ दिवस-रात्र शिव सत्याग्रह करुन गनीमी काव्याने छ.शिवरायांचा आश्वारुढ पुतळा शिवाजी चौकात बसवला.यांना त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार रोहिदासरावजी चव्हाण साहेब व त्यांच्या शिवसैनिकांनी या आश्वारुढ छ.शिवप्रभुंचा पुतळा बसविण्यास राजकिय विरोध बाजुला सारुन आपले निस्सीम शाहीर दाखवून पाठिंबा दिला. रोहिदासराव चव्हाण साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले.नांदेड,लातुर,परभणी या तिनही जिल्ह्यातून अनेक शिवप्रेमी जनतेनी या स्मारकास पाठींबा दर्शविला.
जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड,शासन पुतळ्याची आचारसंहिता पुढे करत तो चौकातील आश्वारुढ पुतळा त्या चौकात रस्त्याच्या कडेला शासनाने अनुमती दिल्याने मध्ये पिंजऱ्यात बसविला. त्या नंतर अनेकवेळा डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी शासनाला जागे करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करुन छ.शिवाजी महाराज यांचा आश्वारुढ पुतळा बसविण्यास प्रयत्नशील होते.दुसरा प्रयत्न ६ जुन २०१२ या वर्षीच्या शिवराज्याभिषेक दिनी अर्ध पुतळा करुन आपण खरे शिवभक्त असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले.एवढे क्रांतिकारी कर्तबगारी करून सुध्दा राजकिय व्देशापोटी डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांना नियोजित भुमीपुजन कार्यक्रमात साधे त्यांचे नाव न घेता,त्यांना निमंत्रित न करता राजकिय सूड भावनेने हे कृत्य राजकारणात विचाराचा विरोध जरुर करा,पण व्देशाने विरोध करणे हे खरच अशोभनीय आहे.याचा जाहीर निषेध….जाहीर निषेध…..जाहीर निषेध अनेकांकडून केला जात आहे.
डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब,यांनी कंधार शहरातील ऐतिहासिक शिवाजी चौकात छ.शिवाजी महाराज यांचा रुबाबदार पुर्णाकृती पुतळा ९ मे १९५९ रोजी गनीम काव्याने बसवून एक ऐतिहासिक अध्याय कंधार शहराच्या इतिहासात निर्माण केला.तसेच कंधार शहरात आई कशी असावी हा आदर्श विजय गडी मातृतीर्थावर गनीमी काव्याने राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचा अर्ध पुतळा १६ डिसेंबर या बांग्लादेश वियजी झाल्या प्रित्यक्ष देशातले एकमेव “जय बांगला स्मारका” समोर उभारला. त्यामुळेच त्यांचेवर गुन्हा दाखल केला.सन्माननीय कंधार कोर्टाने डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांची निर्दोष मुक्तता केली.आदर्श नातू कसा असावा म्हणून माणिक गडावर धर्मवीर छ.संभाजी महाराज यांचा रुबाबदार पुतळा उभारुन आदर्श क्रांतिच निर्माण केली.कंधार नगर परिषदेच्या प्रांगणातील संविधानकार,विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा आणि साहित्य कोहिनूर, शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्ध पुतळा प्राणप्रतिष्ठीत करण्याचे कांती कार्य डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब यांचेच!खरे पाहिले तर लोहा येथील शिवाजी चौकात आहे त्या गोलाईत मध्यभागीच पुतळा बसविण्याची संकल्पना आधी होती….! आज आहे…….!!….अन् उद्या पण पुढेही राहणारच आहे.
जर त्यांना राजकिय व्देश नसता तर त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून संयोजक शिवभक्त डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या समर्थ हस्ते स्मारकाचा भुमीपुजन सोहळा पार पडून आपण ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आहोत. याचा अभिमान त्यांना वाटला असता.छ.शिवरायांचा आश्वारुढ रुबाबदार पुतळा बसविण्याची मुळ संकल्पना शिवभक्त डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांची आहेच!संयोजक डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचा शतकोत्तर वाढदिवस साजरा होत आहे .या शतकोत्सवी चीरतरुण व्यक्तीमत्व डाॅ.भाई साहेब यांच्या समर्थ हस्ते शिवस्मारकाचे भुमीपुजन करुन मनाचा मोठेपण दाखविण्याची खासदार साहेब यांना सुवर्ण संधी होती….पण शिवप्रेमा पेक्षाही राजकिय स्वार्थीपणा वरचढ झाल्याने मागे केलेला शिवस्मारकास विरोध पुसुन काढण्यासाठी ज्येष्ठ अन् श्रेष्ठ शिवभक्तावर राजकिय सुड उगवण्यासाठीच हा अट्टाहास….! राजकिय व्देशातून केला जातोय असा सुर लोहा-कंधार तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात जनसामान्यांच्या चर्चेत दिसून येत आहे.
लोहा मोडवर बळीराजा मार्केट यार्ड यांनी ठराव पारीत केल्या प्रमाणे शिवाजी चौकाच्या मध्यभागी पूर्वी पासून डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांनी सुरु ठेवला…आजही आहे….भविष्यातही राहणारच आहे. तसाच प्रयत्न लोहा शहराचे ह्रदय असलेल्या मोडवरील छ. शिवाजी चौकातछ.शिवप्रभुंचे भव्य स्मारक करण्याची मुहूर्तमेढ रोवली खरी,पण……छ.शिवरायांच्या आश्वारुढ स्मारकाच्या भुमीपुजन सोहळ्यात स्मारक शिल्पकार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचे नाव ही नाही….अन् साधे निमंत्रणही नाही…..जाहीर निषेध लोहा चौकात उभारण्यात येणाऱ्या आश्वारुढ शिवस्मारकासाठी शिव सत्याग्रहात सहभागी शिवभक् २० सत्याग्रहवीरांची यादी
डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे
डाॅ.प्रा.पुरुषोत्तम भाऊ धोंडगे
प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते
माजी आमदार रोहिदास चव्हाण
मधुकर वानखेडे
व्ही.जी. चव्हाण
भाई किशनराव ढगे
अमोल किशनराव ढगे
संदीप व्य॔कटराव चव्हाण
सूर्यकांत लुंगारे
अभंग लोखंडे
रमाकांत जोगदंड
निवृत्ती गुद्दे
सोनबाजी कावळे
बालाजी परोडवाड
बालाजी एमेकर.
शिवाजीराव ऐनवाड
प्रा.शंकराव आंबटवाड
पंडीत पेठकर
अँड प्रकाश डोम्पले
सर्व २० सत्याग्रही वीर यांची सन्मानिय लोहा कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.