
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- सोन्याची उगवली आज सकाळ लोहयाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामास आज दि. १६ जानेवारी २०२२ पासून होणार सुरूवात लोहा शहरात गेली २५ते ३० वर्षापासून लोहा शहरातील नांदेड -लातूर -गंगाखेड-कंधार या चौकातील रस्त्यावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचे राजे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्वारूढ पुतळा व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. यासाठी अनेकांनी मागणी केली अनेकांनी विविध आंदोलने केली.
२०१८ च्या लोहा न.पा.च्या सार्वत्रिक निवडणुका लोकनेते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आल्या त्यावेळी नगराध्यक्ष पद थेट जनतेतून निवडून देयाचे होते तेव्हा गजानन सुर्यवंशी यांच्या वर लोहा शहरांच्या जनतेने लोहा न.पा.त सत्तांतर करून गजानन सुर्यवंशी यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष पदी निवड करून त्यांच्या सहित भाजपाचे १७ पैकी १३ नगरसेवक भरघोस मतांनी निवडून दिले. लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा. अश्वरुढ पुतळा ( स्मारक) उभारण्यात येईल असे आश्वासन जाहिरनाम्यात दिले होते.
या अगोदर अनेकांनी लोहा न.पा.त सता स्थापन केली व लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येईल असे आश्वासन दिले पण ते एकानेही पुर्ण केले नाही पण लोहा न.पा. चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी हे करून दाखविले नुसते बोलवून दाखविले नाही. लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याचे काम नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी हाती घेऊन त्यांचे नेते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी त्यांच्या शी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी शासन स्तरावरील विविध खात्यांच्या मंजूरी घेणे एनओसी घेणे आदी शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून घेतले यासाठी लोहा न.पा.चे उपाध्यक्ष शरद पा.पवार मुख्याधिकारी यांच्या सहीत सर्व नगरसेवक यांनी साथ दिली सर्वांनी एकत्र मिळून लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी प्रयत्न केले. यासाठी लोहा न.पा.ने स्मारकाचे काम करण्याची टेंडर काढले बळीराजा मार्केट ने यासाठी मोफत जागा ही उपलब्ध करून दिली.
खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी व उपअध्यक्ष शरद पवार यानी मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नियोजीत लोहा येथे बसविण्यात येणारा अश्वारूढ पुतळ्याची ही पाहणी केली आहे. तसेच लोहा न.पा. च्या वतीने या स्मारकाच्या बांधकामासाठी 8.5 लक्ष रुपयांचे निविदा काढण्यात आली व ठेकेदारांना लोहा न.पा.ने कार्यआदेश ही देण्यात आला आहे आज प्रत्यक्षात या कामांची सुरुवात होणार असून नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व त्यांच्या टीम ने अथक परिश्रम घेऊन लोहा शहर व तालुक्यातील तमाम शिवप्रेमी जनतेचे स्वप्न पूर्ण करायचे काम हाती घेतले असून आज दि. १६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी -11 वाजता खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे राहणार असून यावेळी प्रमुख उपस्थिती खा. सुधाकर शूंगारे , सर्व सन्माननीय नगरसेवक, यांच्यासहित अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.