
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतुर :- शुक्रवारी तालुक्यातील माव पाटोदा येथे आपले सरकार सेवा केंद्रामार्फत मिनी इंडियन गॅस एजन्सी सुरु करण्यात आली. याप्रसंगी गावच्या सरपंच सौ.सविताताई धोंडीराम नवल यांच्या हस्ते एजन्सीचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत ऑपरेटर विजय बापुराव नवल यांचा मार्फत माव येथे मिनी गॅस एजन्सी सुरू करण्यात आली. विजय नवल यांनी गावकऱ्यांना जीवनावश्यक असणारी गॅस सिलेंडर 24 तास आपल्या गावात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आसे यावेळी म्हटले आहे. या उद्घाटना प्रसंगी गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.