
दैनिक चालु वार्ता
पालघर मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
मोखाडा – हिरवे/घाणवळ या ग्रामपंचायत च्या अंतर्गत येणा-या गाव पाड्यांतील नागरीकांसाठी सोलरद्वारे पाणीपुरवठयाच्या कामाची पाहणी करण्या करिता ग्रामसेवक श्री मंगेश पाटील, माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री अशोक मोकाशी व गावातील नागरिक यांच्या सोबत प्रशासक श्री तुषार सुर्यवंशी यांनी केलेल्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
येत्या 3-4 दिवसात सदर पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू होईल असे प्रशासक श्री तुषार सुर्यवंशी यांनी गावकऱ्यांना सांगितले.
तसेच हिरवे पाटीलपाडा गावात पाणी गेल्या अनेक दिवसा पासून येत नव्हते म्हणून स्थानिक नागरिकांची पिण्याच्या पाण्या साठी खूप अडचण होत होती परंतु सदर ठिकाणी तात्काळ प्रत्यक्ष जाऊन दुरुस्ती करून घेऊन पिण्याच्या पाण्याचा साठा सुरळीत सुरू करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.