
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद पूर्व प्रतिनिधी
मोहन आखाडे
कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता सरकारकडून अधिकाधिक कोरोना चाचण्या करण्याचे आवाहन केले जात आहे.
✅ राज्यात अशा अनेक खाजगी प्रयोगशाळा आहेत ज्यांनी खूप पूर्वीपासून सरकारकडून परवानगी घेतली होती, मात्र त्यांनी आजपर्यंत कोरोनाची एकही चाचणी केलेली नाही. अशा खासगी प्रयोगशाळांना नोटिसा पाठवून परवाना रद्द करण्याचा इशारा दिला जात आहे.
औरंगाबाद शहरातील 39 खाजगी प्रयोगशाळांना अँटीजेन आणि आरपीसीआर चाचण्या करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र यापैकी 15 खासगी लॅबने आतापर्यंत एकही कोरोना चाचणी केली नसल्यामुळे या सर्व 15 लॅबला नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
लॅबला दिलेल्या नोटीसमध्ये लिहिले आहे की, कोरोना चाचणीसाठी लॅबची परवानगी का रद्द करू नये? या बद्दल लवकरात लवकर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
या खासगी लॅबला कोरोना चाचणी न केल्याने नोटीस मिळाली आहे..
एमआयटी हॉस्पिटल, एशियन सिटी केअर, मराठवाडा लॅब रोशनगेट, मिलिटरी हॉस्पिटल कॅन्टोन्मेंट, यशवंत गाडे हॉस्पिटल गारखेडा, शनी मंदिराजवळील आयएमए हॉल, गणेश प्रयोगशाळा, पुंडलिकनगर, ओरियन सिटी केअर हॉस्पिटल, अमृत पॅथॉलॉजी लॅब जालना रोड, सुमांजली नर्सिंग होम, युनिसेफ पॅथॉलॉजी लॅब भडकलगेट, कृष्णा डायग्नोस्टिक, कस्तुरी पॅथ लॅब गारखेडा, सह्याद्री हॉस्पिटल सिडको एन-2 लॅब.